'रात्रीस खेळ चाले' फेम प्रल्हाद कुडतरकर विवाहबंधनात

झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले या मालिकेद्वारे घराघरात पोहोचलेला पांडू अर्थातच लेखक-अभिनेता प्रल्हाद कुडतरकर विवाहबंधनात अडकलाय.

Updated: May 28, 2017, 10:25 PM IST
'रात्रीस खेळ चाले' फेम प्रल्हाद कुडतरकर विवाहबंधनात title=

मुंबई : झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले या मालिकेद्वारे घराघरात पोहोचलेला पांडू अर्थातच लेखक-अभिनेता प्रल्हाद कुडतरकर विवाहबंधनात अडकलाय.

अभिनेता सुयश टिळक याने प्रल्हादच्या लग्नाचा हा फोटो शेअर केलाय. अंजली कानडे हिच्याशी तो विवाहबद्ध झालाय. सुयशने हा फोटो इन्स्टाग्रामवरुन शेअर करताना त्या दोघांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्यात.

रात्रीस खेळ चाले या मालिकेतून प्रल्हादला मोठी प्रसिद्धी मिळाली होती. या मालिकेचे लिखाणही त्याने केले होते. त्याबरोबर पांडू ही व्यक्तिरेखा त्याने साकारली होती. या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दर्शवली होती. या मालिकेनंतर प्रल्हाद सध्या नकटीच्या लग्नाला यायचं हं या मालिकेसाठी लिखाण करतोय. 

 

Congratulations Pralhad. Have a blessed married life and wish you both all the happiness in the world.

A post shared by Suyash Tilak (@suyashtlk) on