आदर्श शिंदे यांच्या आवाजात दमदार गाणं 'प्रभू श्रीराम'; तुम्ही ऐकलात का?

प्रभू श्रीराम या म्युझिक व्हिडिओची निर्मिती सप्तसूर म्युझिकच्या साईनाथ राजाध्यक्ष, बीना राजाध्यक्ष यांनी केली आहे.या गाण्याची संकल्पना साईनाथ राजाध्यक्ष यांची आहे.विपुल शिवलकर यांच्या गीताला ऋषी बी. यांनी संगीतबद्ध केलं आहे. 

Updated: Jan 10, 2024, 06:55 PM IST
आदर्श शिंदे यांच्या आवाजात दमदार गाणं 'प्रभू श्रीराम'; तुम्ही ऐकलात का? title=

मुंबई : अयोध्या येथील प्रभू श्रीराम यांच्या मंदिराचे 22 जानेवारीला उद्‌घाटन होणार आहे. त्यामुळे अवघा देश श्रीराममय झाला आहे. श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाच्या औचित्याने प्रभू श्रीराम या म्युझिक व्हिडिओची निर्मिती करण्यात आली असून, आदर्श शिंदे यांच्या दमदार आवाजातील हा म्युझिक व्हिडिओ सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर हा लाँच करण्यात आला आहे. 

प्रभू श्रीराम या म्युझिक व्हिडिओची निर्मिती सप्तसूर म्युझिकच्या साईनाथ राजाध्यक्ष, बीना राजाध्यक्ष यांनी केली आहे.या गाण्याची संकल्पना साईनाथ राजाध्यक्ष यांची आहे.विपुल शिवलकर यांच्या गीताला ऋषी बी. यांनी संगीतबद्ध केलं आहे.  अयोध्येचा राजा आपला राम मंदिरी अवतरला आता असे या गाण्याचे शब्द आहेत. या गाण्याला असलेलं संगीत प्रत्येक रामभक्ताला उत्साह देणारं आहे. 

ग्राफिक्सचा उत्तम वापर करून या गाण्याचा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. त्यात भावभक्तीने ओथंबलेले श्रीराम भक्त, शरयू तीरावरील आरती, श्रीराम मंदिराची दृश्ये दाखवण्यात आली आहेत. त्यामुळे अवघा देश श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाच्या भव्यदिव्य सोहळ्याकडे डोळे लावून बसलेला असताना आता या प्रभू श्रीराम या गाण्यामुळे रामभक्तांच्या उत्साहाला नक्कीच उधाण येणार आहे.

उत्तर प्रदेशात 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या मंदिरात प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी अनेक बड्या व्यक्तींना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. यामध्ये राजकारण्यांपासून सेलिब्रिटींपर्यत निमंत्रणपत्रिका पाठवण्यात आल्या आहे. 

नेपाळच्या शालिग्रामी अर्थात बुढी गंडकी नदीतून या शिळा काढण्यात आल्या. मिथिला अर्थात नेपाळ ही प्रभू श्रीरामांची सासरवाडी. त्यामुळं राम-सीतेच्या  मूर्ती बनवण्यासाठी अर्थातच मिथिलेतल्या शाळीग्राम शिळांची निवड करण्यात आली. त्याआधी नदीची क्षमा मागण्यात आली, खास पूजाविधीही करण्यात आला.

२२ जानेवारी मुहूर्तावर अयोध्येतील श्रीराम मंदिराचे दरवाजे सामान्य लोकांसाठी खुले होणार आहेत. त्यावेळी शाळीग्राम शिळांमधून साकारलेल्या रामलल्लाचं दर्शन सगळ्यांना होणार आहे. त्यामुळे आता रामभक्त राममंदिराची आतुरतेने वाट पाहत आहेत. शिळा काढण्यासाठी अर्थातच नेपाळ सरकारची परवानगीही घेण्यात आली. तब्बल 40 टन वजनाच्या या शिळा आहेत. त्या सुमारे 6 कोटी वर्षे प्राचीन असल्याचा दावा केला जातोय.