'पद्मावत'वर पूनम पांडेने केलं ट्विट, युजर्सने म्हटलं...

संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित 'पद्मावत' सिनेमा अखेर प्रदर्शित झाला आहे. 

Sunil Desale Sunil Desale | Updated: Jan 28, 2018, 10:30 PM IST
'पद्मावत'वर पूनम पांडेने केलं ट्विट, युजर्सने म्हटलं... title=
Image: @iPoonampandey/Twitter

मुंबई : संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित 'पद्मावत' सिनेमा अखेर प्रदर्शित झाला आहे. अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या वादामुळे या सिनेमाची सर्वत्र जोरदार चर्चा होती. विरोधानंतर २५ जानेवारीला 'पद्मावत' सिनेमा प्रदर्शित झाला.

'पद्मावत' सिनेमाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं पहायला मिळत आहे. त्यामुळेच सिनेमाने तीन दिवसांतच ८३ कोटींहून अधिक कमाई केली आहे. या सिनेमात अभिनेता रणवीर सिंह, शाहिद कपूर, अभिनेत्री दीपिका पदुकोण यांची मुख्य भूमिका आहे.

पूनम पांडेचं मजेशीर ट्विट

हा सिनेमा पाहिल्यानंतर सामान्य प्रेक्षकांपासून सेलिब्रेटींनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. याच दरम्यान इंटरनेटवर नेहमीच चर्चेत असणारी मॉडेल पूनम पांडेने 'पद्मावत' सिनेमावर एक मजेशीर ट्विट केलं आहे. 

पूनमने ट्विट करत म्हटलं आहे की, "आज पद्मावत पहायला जात आहे. हा सिनेमा टीव्ही शो 'खतरों के खिलाडी' मधील एक टास्क असायला हवा".

पुनम पांडेने केलेल्या या ट्विटनंतर ट्विटर युजर्सने पुनमची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे. पाहूयात पुनमच्या ट्विटवर कुणी काय म्हटलं आहे.

'पद्मावत' सिनेमाचं एक तिकीट तब्बल ३०० रुपयांपासून ३ हजार रुपयांच्या घरात आहे. पहिल्याच दिवशी सिनेमाला ५० ते ६० टक्के ओपनिंग मिळालं. 

फेसबुकवर ऑनलाईन लीक

पद्मावत सिनेमा फेसबुकवर ऑनलाईन लीक झाला आहे. जवळपास साडेतीन लाख यूझर्सनी हा ऑनलाईन लीक झालेला सिनेमा पाहिल्याचं बोललं जात आहे.