पूजा सावंत आणि भूषण प्रधानने उरकला गुपचूप साखरपुडा? व्हिडिओ व्हायरल

पूजा सावंत ही सोशल मीडियावर सगळ्यात जास्त सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. पूजा सावंत तिच्या व्यवसायिक आयुष्यामुळे तर चर्चेत असते पण वैयक्तिक आयुष्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते.

Updated: Jan 25, 2023, 12:19 PM IST
पूजा सावंत आणि भूषण प्रधानने उरकला गुपचूप साखरपुडा? व्हिडिओ व्हायरल title=

Happy Birthday Pooja Sawant : मराठी मनोरंजन विश्वातील बहुचर्चित अभिनेत्रींपैकी एक असलेल्या पूजा सावंत हिचा आज २५ जानेवारी वाढदिवस आहे. केवळ मराठी चित्रपटच नाही, तर तिने बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. बालपणापासूनच नृत्याची आवड असणाऱ्या पूजाने डान्स शोमधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. हळूहळू ती नाटक, मालिका आणि चित्रपटांकडे वळली. तिच्या या प्रवासात तिने अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

अभिनेत्री पूजा सावंत ही तिच्या फिटनेस आणि फॅशनमुळे ओळखली जाते. तिने अनेक प्रसिद्ध चित्रपटांत काम केलं आहे. तिनं तिच्या अभिनयाने  मराठी इंडस्ट्रीमध्ये स्थान निर्माण केलं. यापूर्वी पूजाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये तिनं सिद्धार्थ मल्होत्रा माझं क्रश आहे आणि त्याच्यासोबत मला लग्न करायला आवडेल अशी कबुली दिली होती या व्हिडिओला प्रचंड प्रतिसाद मिळाला. 

अनेकदा पूजा तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. कधी तिचं नाव वैभव तत्ववादी सोबत जोडलं गेलं आहे तर कधी तिचं नाव भूषण प्रधानसोबत जोडलं गेलं आहे. असं असतानाच पूजाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पूजा आणि भूषण हाततल्या अंगठ्या दाखवताना दिसत आहे. त्यामुळे असा अंदाज बांधला जात होता की, या दोघांनी साखरपूडा केला आहे. हा व्हिडिओ समोर येताच सोशल मीडियावरील युजर्सने कमेंट करत या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मात्र आता आम्ही तुम्हाला या व्हिडिओ मागचं सत्य सांगणार आहोत. हा व्हिडिओ केवळ एक जाहिरात शूट करतेवेळीचा आहे. जो तुफान व्हायरल झाला आहे. यानंतर या दोघांनी त्यांच्या जाहिरातीचा व्हिडिओ शेअर केला. त्यामुळे या दोघांमध्ये सुरु असणारी चर्चा ही केवल अफवा होती.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पूजा सावंत ही सोशल मीडियावर सगळ्यात जास्त सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. पूजा सावंत तिच्या व्यवसायिक आयुष्यामुळे तर चर्चेत असते पण वैयक्तिक आयुष्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. तिचं अनेकदा कोणा न कोणा कलाकारासोबत नाव जोडताना पाहिलं आहे. अशा बातम्या या नेहमीच सोशल मीडियामुळे नेहमी पुढे येत असतात.