हुनरबाजच्या सेटवर पोलिसांची धाड, करण-परिणीतीला पोलिसांकडून अटक?

हुनरबाज या रिएलिटी शोवर हिमाचल पोलिसांनी छापा टाकला. 

Updated: Feb 12, 2022, 03:20 PM IST
हुनरबाजच्या सेटवर पोलिसांची धाड, करण-परिणीतीला पोलिसांकडून अटक?  title=

मुंबई : हुनरबाज या रिएलिटी शोवर हिमाचल पोलिसांनी छापा टाकला. स्टेजवर पोलिसांना पाहून जज मिथुन चक्रवर्ती, परिणीती चोप्रा आणि करण जोहर थक्क झाले. प्रेक्षकांच्याही भुवया उंचावल्या होत्या. कारण कोणीही मास्क घातलेला नव्हता. तर दुसरीकडे हिमाचलचे पोलीस कर्मचारी  सेटवर येताच त्यांच्या पोलीस स्टाईलमध्ये म्हणाले की,  काय मस्करी लावली आहे. प्रत्येकाचे मास्क कुठे आहेत?

पोलिसांच्या तोंडून हे ऐकून सर्वांचं बोलणं थांबलं आणि शांतता पसरली. दरम्यान, करण जोहर म्हणाला, चला शूट करूया, मात्र पोलीस जवान म्हणाले की, कोरोनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करणं आवश्यक आहे. तुम्ही आधी मास्क घाला, मग तुम्हाला जे करायचे ते करा. हे ऐकून करण जोहर हात जोडून म्हणू लागला, आम्ही माफी मागतो. मग घाईघाईत सर्वांनी मास्क घातले.

असं समोर आलं छापेमारीचं सत्य समोर
त्याचवेळी सगळ्यांच्या भुवया उंचावल्यानंतर अधिकाऱ्यांनीही आपल्या टीमला मंचावर बोलावलं. त्यानंतर सगळे जोरात हसायला लागले. यावेळी जजचे चेहरे पाहण्यासारखे होते. करण जोहर टोमणे मारत म्हणाला, हे काय आहे? त्याला उत्तर देताना हिमाचल पोलिस कर्मचारी म्हणाले की, तुम्ही लोकं अभिनय करता, मग विचार केला की, आम्ही ही अभिनय का करू नये. शेवटी आपणही तरबेज आहोत. हे ऐकून जज हसले आणि तिघांच्याही तोंडून बाहेर पडलं, ओएमजी, हे टॅलेंट आहेत. आज पोलीस स्टेशनची हवा खावी लागेल अशी भीती वाटत होती.

राजकीय मान्यता प्राप्त आहे हिमाचल पोलिसचा हा बँड
मंचावरून हिमाचल पोलिसांनी संपूर्ण हिंदुस्थानला सांगितलं की, हा बँड पोलिसांचा सरकारी मान्यताप्राप्त बँड आहे आणि त्यांना देशात कुठेही कार्यक्रम करण्याची परवानगी आहे. त्याबद्दल त्यांनी डीजीपी संजय कुंडू यांचेही आभार मानले. हिमाचल पोलीस बँडने सांगितलं की, हा बँड 1996 मध्ये सुरू झाला होता. मात्र त्यावेळी सुविधांचा अभाव असल्याने केवळ सात जवान एकत्र येवून हा बॅन्ड सुरू झाला. सरावासाठी खोली नव्हती, वाद्य नव्हती.  हिमाचल प्रदेश पोलिस हार्मनी ऑफ पाइनला सरकारने अधिकृतपणे मान्यता दिली आहे. डीजीपी कुंडू यांच्या प्रेरणेने ते ईथे  पर्यंत पोहचले.