श्रीदेवींच्या निधनावर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दु:ख

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं दुबईच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 25, 2018, 01:02 PM IST
श्रीदेवींच्या निधनावर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दु:ख title=

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं दुबईच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.

अचानक एक्झिट

श्रीदेवी आपल्या कुटुंबियांसोबत एका विवाह सोहळ्यासाठी तेथे गेल्या होत्या. श्रीदेवींच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूडवर विश्वावर शोककळा पसरली आहे. अनेकांना या बातमीने धक्का बसला आहे.

पतंप्रधान मोदींची प्रतिक्रिया

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील श्रीदेवींच्या निधनावर ट्विट केलं आहे. त्यांनी म्हटलं की, 'प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचं अयोग्य क्षणी आणि अचानक निधनाने दु:खी आहे. त्यांच्या करिअरमध्ये त्यांनी अनेक अशा लक्षात राहणाऱ्य़ा भूमिका केला. मी अशा दु:खाच्या वेऴी त्यांच्या परिवारासोबत आहे. त्यांच्या आत्मास शांती लाभो.'