'फूल और कांटे"मधील ही हिरोईन पाहा आता कशी दिसते...

बॉलीवूडमध्ये अशा काही अभिनेत्री वा अभिनेते आहेत ज्यांना पहिल्याच सिनेमाने अमाप प्रसिद्धी मिळवून दिली. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Mar 9, 2018, 04:10 PM IST
'फूल और कांटे"मधील ही हिरोईन पाहा आता कशी दिसते... title=

मुंबई : बॉलीवूडमध्ये अशा काही अभिनेत्री वा अभिनेते आहेत ज्यांना पहिल्याच सिनेमाने अमाप प्रसिद्धी मिळवून दिली. 

काही कलाकार पहिल्याच सिनेमातून हिट होत मोठे सुपरस्टार झाले तर काही त्यानंतर सिनेसृष्टीतूनच गायब झाले. 

त्यापैकीच एक म्हणजे मधुबाला रघुनाथ. तिला मधु शाह नावानेही ओळखले जाते. मधु ९० च्या दशकातील सिनेमांमध्ये दिसली होती. पहिल्याच सिनेमाने तिला स्टार केले. 

मधुने बॉलीवूडमध्ये पाऊल टाकले आणि पहिल्या सिनेमात तिला अजय देवगणसोबत काम करण्याची संधी मिळाली. अजय देवगणचाही तो पहिला सिनेमा होता.

मधु आणि अजयने 'फूल और काँटे' या सिनेमात एकत्र काम केले होते. हा सिनेमा हिट ठरला. त्यानंतर मधुने रोजा सिनेमात केले. या सिनेमातीलही तिच्या कामाचे कौतुक झाले. 

त्यानंतरही तिने काही सिनेमांमध्ये काम केले. दिलजले, यशवंतसारख्या सिनेमांमध्ये तिने काम केलेय. मात्र त्यानंतर बॉलीवूडशी असलेले तिचे नाते तुटले. लग्नानंतर मधु बॉलीवूडमध्ये दिसली नाही. मधु अद्यापही सुंदर दिसते. तिला दोन मुले आहेत.