अभिनेत्री तितीक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडकेच्या साखरपुड्याचे फोटो समोर

तितिक्षा आणि सिद्धार्थने गुपचूप साखरपुडा उरकला आहे. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

Updated: Feb 25, 2024, 07:35 PM IST
अभिनेत्री तितीक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडकेच्या साखरपुड्याचे फोटो समोर  title=

मुंबई : सध्या सगळीकडे लग्नाचा माहोल सुरु आहे. नुकतंच अभिनेत्री पूजा सावंतचा संगीत सोहळा पार पडला. तर दुसरीकडे नुकतीच रकुल प्रीत लग्नबंधनात अडकली आहे. अनेक कलाकार त्यांच्या प्रेमाची कबुली देत आहे. मात्र आता एका मराठमोळ्या अभिनेत्रीने साखरपुडा केला आहे. ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अभिनेत्री तितीक्षा तावडे आणिअभिनेता सिद्धार्थ बोडके  यांचा साखरपुडा जवळचे नातेवाईक, कुटुंबीय आणि मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत पार पडला आहे. नुकतेच तितिक्षाने तिच्या साखरपुड्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

तितीक्षा तावडे आणिअभिनेता सिद्धार्थ बोडके यांनी काही दिवसांपूर्वीच केळवणाचा फोटो शेअर करत प्रेमाची जाहीर कबुली सोशल मीडियावर दिली होती. यानंतर तितिक्षाने तिच्या युट्यूबवर प्रपोजचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. नुकतीच तितिक्षा आणि सिद्धार्थने गुपचूप साखरपुडा उरकला आहे. या दोघांच्या साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या दोघांच्या साखरपुड्यानंतर त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का मिळाला आहे. 

अनेकांनी त्याच्या फोटोंवर लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने कमेंट करत लिहीलं आहे की, तु अशी जवळी रहा. तेव्हा वाटलं होतं ते आता खरं होताना दिसत आहे. तर अजून एकाने कमेंट करत लिहीलं आहे की, किती गोड. तर अजून एकाने लिहीलंय, तु अशी जवळी रहा, अखेर जवळ आले. तर अजून एकाने लिहीलं, मनःपूर्वक अभिनंदन. तर अजून एकाने लिहीलंय, खूप छान आहेत फोटो. तर अनेकांनी त्यांच्या या फोटोवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तर अनेक कलाकारांनीही या जोडीला शुभेच्छा दिल्या आहेत. लवकरच ही जोडी लग्नबंधनात अडकणार आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तितीक्षाने यावेळी  फिकट जांभळ्या रंगाची डिझाइनर साडी नेसली होती. तर, सिद्धार्थने ऑफ व्हाइट रंगाची शेरवानी परिधान केल्याचं या फोटोमध्ये दिसत आहे.  साखरपुड्याचे फोटो शेअर करत या फोटोला  ‘Forever with my best friend’ असं कॅप्शन दिलं आहे. सध्या मराठी कलाविश्वातून या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. तितिक्षा आणि सिद्धार्थ २६ फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकणार असल्याचं बोललं जातंय.