मुंबई : एक स्त्री असणं वाटते तितकी सोपी गोष्ट नाही, हे एक स्त्रीच जाणू शकते. कारण, स्त्रिच्या वाट्याला येणारी प्रत्येक गोष्ट क्षणाक्षणाला तिची परीक्षा घेत असते. रोजच्या दिवसात ही स्त्री, महिला जे काही झेलते ते पाहता ती खरी रणरागिणी आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
कधी स्त्रीमनाचा विचार केलाय का तुम्ही? केलाही असेल पण मुद्दा इथं तुम्ही किती यशस्वीपणे मन वाचलंत त्याचा आहे.
नुकतंच एका लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीनं सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये ती अभिनेत्री ओळखूच येत नाहीये. कधी एकेकाळी शाहरुखशी रोमांस करणारी, बोल्ड भूमिकाही साकारणाही ही अभिनेत्री आता खरंच इतकी बदललीये ? हाच प्रश्न तुम्ही तिच्याकडे पाहून विचाराल.
ही अभिनेत्री आहे, समीरा रेड्डी. समीरानं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका फोटोमुळं या चर्चांना अचानकच उधाण आलं आहे. समीरानं एक फोटो शेअर करत गरोदरपणानंतरच्या नैराश्यावर तिची भूमिका स्पष्ट केली आहे. (photo Bollywood Actress sameera reddy will shock you new photo viral )
मी शेअर केलेला हा फोटो तेव्हाता आहे जेव्हा माझी अवस्था अतिशय वाईट होती. माझ्या पहिल्या बाळाच्या जन्मानंतरही मला आनंद वाटत नव्हता, असं लिहित तिनं तणाव आणि नैराश्याचा एक वेगळा चेहरा जगासमोर आणला.
तुम्ही एकटे नाही, अशा कठिण प्रसंगामध्ये एकमेकांची साथ कधीही महत्त्वाची.... असं म्हणत समीरानं मानसिक आरोग्याचा समतोल राखतेवेळी स्वत:ची आणि इतरांची मदत नेमकी कशी केली जावी, यासाठी काही उपाय सांगितले.
- कोणतेही पूर्वग्रह न ठेवका ऐका.
- तुमचा दृष्टीकोन आणि मत मांडा.
- एक असं मित्रांचं वर्तुळ पाहा जिथं सकारात्मक गोष्टी बोलल्या जातात.
- रोज रात्री 8 तासांची झोप घ्या.
- मोबाईलवर कमीक कमी वेळ घालवा.
- ज्या गोष्टीचा तुम्हाला त्रास होतोय त्याचं चिंतन करा.
- जे काही खाताय त्यावर लक्ष द्या.
- 30 मिनिटं किमान व्यायाम करा.
- विचार एखाद्या वहित लिहून ठेवा.
- नवं काहीतरी शिका.
- प्रत्येक त्रुटीवर नैसर्गिक मार्गानं तोडगा काढण्याचा प्रयत्न करा.
समीरानं शेअर केलेली ही पोस्ट पाहिलानंतर, महिलांच्या मानसिक आरोग्यावर प्रश्न उपस्थित करण्यापूर्वी तुम्हीही दोन वेळा विचार कराल.