मुंबई : दक्षिणातील अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरियर त्यावेळी चर्चेत आली जेव्हा 'उरु अदार लव'च्या एका गाण्यातील तिचा सीन व्हायरल झाला. सोशल मीडियावर त्या सीनला खूप पसंती मिळाली. प्रिया एका रात्रीत स्टार झाली. पण प्रियाच्या या गाण्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. एका नंतर एक प्रियाच्या गाण्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.
'उरु अदार लव' सिनेमातील त्या गाण्यात दाखवण्यात आलेला सीन हा इस्लाम विरोधी असल्याचं म्हटलं आहे. हैदराबादमधील २ पक्षांनी याच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. प्रिया या गाण्याविरोधात फेब्रुवारीमध्ये देखील महाराष्ट्रातील एका स्थानिक संघटनेने विरोध केला होता. मुस्लिमांच्या भावना दुखावल्याचा आरोप त्यांनी केला होता. दिग्दर्शक ओमर लुलु विरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता.