Pawandeep Rajan ची एकून संपत्ती तुम्ही व्हाल थक्क

इंडियन आयडल जिंकल्यानंतर पवनदीपच्या संपत्तीत मोठी वाढ

Updated: Sep 22, 2021, 10:17 AM IST
Pawandeep Rajan ची एकून संपत्ती तुम्ही व्हाल थक्क title=

मुंबई : इंडियन आयडल फेम पवनदीप राजने त्याच्या गोड आवाजने सर्वांना वेड लावलं आहे. आयडल बनल्यानंतर सतत सर्वत्र त्याच्या चर्चा असतात.  उत्तराखंडच्या पवनदीप राजनने पहाडी गाण्यांद्वारे आणि आपल्या मधुर आवाजाने पदार्पण करत, केवळ उत्तराखंडच्या लोकांनीच नव्हे तर संपूर्ण भारतातील लोकांना त्यांच्या आवाजाने वेड लावले आहे. आज देखील सोशल मीडियावर त्याचे गाणे सतत पाहिले आणि ऐकले जातात. एवढंच नाही सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

इंडियन आयडलनंतर पवनदीपच्या चाहत्यांमध्ये वढ तर झालीच पण त्याच्या संपत्तीमध्ये देखील मोठे बदल झाले आहेत. इंडियन आयडलनंतर पवनदीपला नव्या संधी मिळत आहेत. त्यामुळे त्याच्या नेट वर्थमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. रिपोर्टनुसार, पवनदीपकडे जवळपास 1 मिलियन डॉलर ते 2 मिलियन डॉलरपर्यंत संपत्ती आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार पवनदीपची सॅलरी जवळपास 10 ते 20 लाख रूपये आहे. महत्त्वाचं म्हणजे पवनदीप एक रॉयल आयुष्य जगतो. एवढंच नाही तर पवनदीपकडे Mahindra XUV 500 लग्जरी कार देखील आहे. पवनदीपची प्रतिभा पाहता 2016 मध्ये उत्तराखंड सरकारने त्याला युवा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून घोषित केले.