Pavitra Rishta 2.0: अंकिता लोखंडे पुन्हा अर्चनाच्या भूमिकेत

सुशांत सिंह राजपूत साकारत असलेल्या भूमिकेचा शोध सुरू 

Updated: May 24, 2021, 10:39 AM IST
Pavitra Rishta 2.0: अंकिता लोखंडे पुन्हा अर्चनाच्या भूमिकेत title=

मुंबई : 'पवित्र रिश्ता' छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका. 2014 साली ही मालिका ऑफ एअर गेली. मात्र आता ही मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यामुळे चाहत्यांमध्ये खूप उत्साह पाहायला मिळत आहे. ही मालिका सुरूवातीला देखील अतिशय लोकप्रिय मालिका ठरली आहे. सुशांत सिंह राजपूत या मालिकेत मानव हे पात्र साकारत होता. सुशांत आणि अंकिताची जोडी या मालिकेत अतिशय लोकप्रिय होती. आता ही मालिका डिजिटल रुपात पाहायला मिळणार आहे. 

अंकिता लोखंडे अर्चनाची भूमिका साकारणार आहे. मात्र सुशांत सिंह राजपूत साकारत असलेल्या 'मानव' चा शोध सुरू आहे. अभिनेता मनित जौरा ही भूमिका साकारत असल्याची चर्चा आहे. तसेच या मालिकेतील आणखी एक लोकप्रिय पात्र म्हणजे 'सविता ताई' ही भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी साकारली होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Usha Nadkarni (@usha__nadkarni)

अर्चनाची भूमिका अभिनेत्री अंकिता लोखंडे साकारणार आहे. मात्र सुशांत सिंहच्या भूमिकेकरता मात्र अद्याप कुणाचीही निवड झालेली नाही. उषा नाडकर्णी देखील या डिजिटल वर्जनमध्ये सहभागी होणार नाही. याची माहिती त्यांनी पिंकविलाच्या मुलाखतीत दिली. कोरोनाचा धोका पाहता त्यांचं वय 72 वर्षांचं आहे. तसेच त्यांना शुगरचा त्रास देखील आहे. त्यामुळे त्यांचे कुटुंबिय चिंतेत आहेत. 

उषा नाडकर्णी या मराठी बिग बॉसमध्ये होत्या. त्यानंतर त्यांना हिंदी बिग बॉसमध्ये 15 दिवसांकरता बोलावलं होतं. मात्र कोरोनाच्या या काळात त्यांनी कोणतंही काम करायचं नाही. कारण सगळं फाइनल होऊनही त्यांच्या मुलाने त्यांना यामध्ये सहभाग घेण्यास नकार दिला.