कानपूरच्या आदर्श पतीचा फर्स्टलूक प्रदर्शित

'पती पत्नी और वो' चित्रपटाचा फर्स्टलूक    

Updated: Oct 15, 2019, 02:15 PM IST
कानपूरच्या आदर्श पतीचा फर्स्टलूक प्रदर्शित title=

मुंबई : कानपूरचा सर्वात आदर्श पती अशी ओळख आता अभिनेता कार्तिक आर्यनची झाली आहे. कार्तिकचा 'पती पत्नी और वो' चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. खुद्द कार्तिकने चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित केला आहे. चित्रपटात कार्तिक शिवाय अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडे देखील झळकणार आहे. अनेक दिवसांपासून चित्रपटाच्या चर्चा चांगल्याच पसरत आहे. 

सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये कार्तिक दुचाकीवर बसलेला दिसत आहे. पोस्टरमध्ये तो सर्वसामान्य पेहरावात झळकत आहे. पोस्ट शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये 'काय हास्य आहे...कानपूरचा सर्वात आदर्श पती...' असे लिहिले आहे. त्याचप्रमाणे अभिनेत्री अनन्या पांडे आणि भूमी पेडणेकरचा देखील पहिला लूक प्रदर्शित झाला आहे.

 

विवाहबाह्य संबंधांवर आधारीत अभिनेता कार्तिक आर्यनचा 'पती पत्नी और वो' चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. ६ डिसेंबर रोजी हा चित्रपट रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे.