Parineeti Chopra Angry Video Before Wedding: सध्या जोरदार चर्चा आहे ती म्हणजे परिणीती चोप्रा आणि आपचे आमदार राघव चड्ढा यांच्या लग्नाची. 24 सप्टेंबर रोजी उदयपूर येथील ताज लीला पॅलेसमध्ये त्या दोघांचेही लग्न होणार आहे. त्यामुळे त्यांच्या लग्नाची सध्या जय्यत तयारी सुरू झाली आहे. आजपासून त्यांच्या लग्नाची तयारी सुरू झाल्याचे दिसून येते आहे. त्यामुळे तिची आणि राघव चड्ढा या दोघांची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावर्षी 13 मे रोजी त्या दोघांचाही साखरपुडा झाला आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली होती.
त्यापुर्वी ते दोघं हे अनेकदा स्पॉट झाले होते. त्यातूनही मार्च-एप्रिलपासून त्या दोघांची जोडी बरीच चर्चेत होती. एव्हाना त्यांच्या अफेअरची चर्चा रंगली होती परंतु पाहता पाहता त्यांनी चक्क लग्नाचा बेतच पक्का केला. त्यामुळे त्यांच्या साखरपुड्याचेही फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत होते. आता पुन्हा एकदा त्यांचीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे, कारण अवघ्या काही दिवसांनी ते दोघंही विवाहबंधनात अडकणार आहेत.
हेही वाचा : 'इश्क में दिल...'; शाहरूखला दीपिकाने Kiss करताना पाहून पती रणवीरची लक्षवेधी कमेंट
हा संपुर्ण आठवडा त्यांच्या लग्नाचाच असणार आहे. त्यातून आजपासून त्यांच्या लग्नाच्या काही विधींनाही सुरूवात झालेली आहे. अशातच याआधी त्यांच्या लग्नाची पत्रिकाही व्हायरल झाली होती. त्याचसोबत त्यांच्या लग्नाचे वेळापत्रकही व्हायरल झाले होते. 23 सप्टेंबरपासून त्यांच्या लग्नाच्या वेलकम लंचची सुरूवात होणार आहे. त्यामुळे 'ग्रेन्स ऑफ लव' असं या वेलकम लंचला नाव देण्यात आलं आहे. दुपारी 12 वाजल्यापासून ते पुढे 4 वाजेपर्यंत त्यांच्या या वेलकम लंचची तयारी असेल. त्यातून हे लंच कोर्टयार्डमध्ये होईल. दोम दिवस ही वेडिंग सेरेमनी अशेल. त्यानंतर हे वेलकम लंच झाल्यानंतर त्या दोघांचेही लग्न संपन्न होईल. परंतु या चर्चांदरम्यान परिणीतीचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
यावेळी व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत दिसते आहे की परिणीती ही गाडीतून उतरताना दिसते आहे. सोबतच ती फारच रागात दिसते आहे. त्यातून यावेळी पापाराझी तिला स्पॉट करण्यासाठी येतात तेवढ्यातच ती चिडते आणि म्हणते की, मी तुम्हाला बोलवलं नाहीये. आणि असं म्हणून निघून जाते आणि मग तिची चांगलीच चर्चा रगंलेली असते. यावेळी तिला अनेक जणं ट्रोलही करताना दिसत आहेत.