आघाडीचा बॉलिवूड अभिनेता पत्नीसोबत Boys Hostel मध्ये राहतो तेव्हा...

आता आघाडीच्या एका कलाकाराबाबत मोठी गोष्ट समोर आली आहे.

Updated: Mar 19, 2022, 08:08 PM IST
  आघाडीचा बॉलिवूड अभिनेता पत्नीसोबत Boys Hostel मध्ये राहतो तेव्हा... title=

मुंबई : सेलिब्रिटी त्यांच्या स्टाईलिंग आणि फॅशनमुळे सतत चर्चेत असतात, त्यांच्या चाहत्यांना आपल्या आवडत्या कलाकाराची स्टाईल फॉलो करायला फार आवडते. सोबतच कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यात देखील त्यांचे फॅन्स उत्सुक असतात.आता आघाडीच्या एका कलाकाराबाबत मोठी गोष्ट समोर आली आहे.

बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी हे इंडस्ट्रीतील प्रसिद्ध स्टार आहेत. पंकज यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर आज इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

त्यांनी आपल्या मेहनतीने स्वत:चं स्थान मिळवले आहे. चित्रपटांव्यतिरिक्त पंकज त्रिपाठी यांनी ओटीटीवरही छाप उमटवली आहे.सध्या अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित एक किस्सा चांगलाच चर्चेत आहे.

नुकताच पंकज त्रिपाठी यांनी एका मुलाखतीदरम्यान त्यांच्या आयुष्याशी संबंधित एक किस्सा सांगितला. अभिनेत्याने स्वतःबद्दल आणि पत्नी मृदुलाबद्दल बोलताना सांगितले की, ते 1993 मध्ये मृदुलाला भेटले होते आणि 2004 मध्ये त्यांनी लग्न केले.

अभिनेत्याने पुढे सांगितले की, त्यावेळी त्यांच्याकडे भाड्याने घर घेण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळेच त्यांनी पत्नीला बॉईज हॉस्टेलमध्येच त्यांच्यासोबत राहायला सांगितले. अभिनेत्याने पुढे खुलासा केला की, मुले वसतिगृहात खूप आरामात राहतात. मात्र, माझी पत्नी मृदुला तिथे राहत असल्याने ते सर्वजण अतिशय सभ्य पद्धतीने वागत होते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पंकज त्रिपाठी पुढे म्हणाले की, काही वेळाने त्यांच्या वॉर्डनला ही बाब कळाली. यानंतर एके दिवशी वॉर्डन माझ्याकडे आला आणि त्याने मला विचारले की भाड्याच्या घरात कधी शिफ्ट होत आहे.

त्यांनी सांगितलेला हा किस्सा सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे.