'तुझ्या शिवाय मी...' भीषण अपघातात जीव गमावलेल्या अभिनेत्याच्या गर्लफ्रेंडची भावुक पोस्ट

आपण ज्या व्यक्तीवर निस्वार्थपणे प्रेम करतो... त्याचा डोळ्यादेखत मृत्यू पाहिल्यानंतर....  

Updated: Feb 17, 2022, 01:40 PM IST
'तुझ्या शिवाय मी...' भीषण अपघातात जीव गमावलेल्या अभिनेत्याच्या गर्लफ्रेंडची भावुक पोस्ट title=

मुंबई : 'आपण आपल्या भविष्यासाठी खूप काही ठरवलं होतं... पण तू निघून गेलास... तुझ्या शिवाय मी कशी जगू.. ' आपण ज्या व्यक्तीवर निस्वार्थपणे प्रेम करतो... त्याचा डोळ्यादेखत मृत्यू पाहिल्यानंतर त्या व्यक्तीची परिस्थिती कशी असेल... या गोष्टीचा आपण अंदाज देखील लावू शकत नाही. मंगळवारी  पंजाबी अभिनेता दीप सिद्धूचा दिल्ली सीमेजवळ झालेल्या अपघातात मृत्यू झाला. निधनानंतर त्याची गर्लफ्रेंड रीना रायने सोशल मीडियाच्या माध्यमातून दुःख व्यक्त केलं...

पोस्टमध्ये रीना म्हणते, 'मी आता एकटी झाली आहे... मला वचन दिलं होतंस, की तू मला आयुष्यात कधी सोडून जाणार नाही.. मी जेव्हा रुग्णालयात होते तेव्हा मला भास झाला... तू माझ्या कानात 'आय लव्ह यू...' म्हणून गेलास...'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे रीना म्हणते, 'आपण आपल्या भविष्यासाठी खूप काही ठरवलं होतं... पण तू निघून गेलास... तुझ्या शिवाय मी कशी जगू... आयुष्यभराचे जोडीदार कधी सोडून जात नाहीत.. मी तुला या पलिकडे भेटल.... ' सध्या तिची ही भावुक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

दरम्यान, पंजाबी अभिनेता दीप सिद्धूचा जेव्हा अपघात झाला तेव्हा त्याची गर्लफ्रेंड रीना राय देखील त्याच्यासोबत होती. अपघातात रिना किरकोळ जखमी झाली आहे. पण अभिनेत्यांचा मात्र मृत्यू झाला. सध्या तिच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू आहे.