Palak Tiwari on Salaman Khan having a Rule on women's clothes : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीची (Shweta Tiwari) लेक पलक तिवारी (Palak Tiwari) लवकरच 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, पलकनं अनेक गोष्टींचा खुलासा केला होता. यावेळी पलकनं खुला केला होता की सलमान खानच्या (Salman Khan) सेटवर मुलीनी ड्रेस परिधान करण्यावर काही नियम आहेत. पलकचं हे वक्तव्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरल्यानंतर तिनं सांगितलं की तिचं वक्तव्य चुकीच्या पद्धतीनं घेतलं जातं आहे. तर त्या सगळ्याचा अर्थ असा नाही असं पलक यावेळी म्हणाली.
पलक तिवारी यावर बोलताना एका मुलाखतीत म्हणाली, 'मी जे म्हटलं ते चुकीच्या पद्धतीनं घेतलं. मला फक्त इतकं बोलायचं आहे की मी स्वत: साठी काही नियम बनवले आहेत. ते म्हणजे आपण ज्या सीनीयर्स समोर काम करत आहोत त्यांच्यासमोर आपण कसे कपडे परिधान करायला हवे. सलमान सर त्यांच्यापैकीच एक आहेत. पण ज्या प्रकारे चर्चा सुरु आहे तसं मी काहीही बोलले नाही.'
सिद्धार्थ कन्ननच्या मुलाखतीत पलकनं सलमानच्या सेटवर असलेल्या एका गोष्टीविषयी सांगितले होते. पलकनं अंतिम चित्रपटात सलमान खानसोबत काम करताना आलेला तिचा अनुभव सांगितला आहे. सलमान खाननं त्याच्या सेटवर काम करणाऱ्या महिलांसाठी एक नियम बनवला आहे. मुलींनी नेहमी त्यांचं शरीर झाकलं जाईल असेच कपडे परिधान करायला हवे. पलकनं सांगितलं होतं की 'एकदिवस तिनं जॉगर्स आणि शर्ट परिधान केलं होतं. या कपड्यात तिला बाहेर जाताना पाहून तिची आई श्वेतानं आश्चर्य चकीत होऊन विचारलं की इतके चांगले कपडे तू कसे परिधान केलेस. तेव्हा पलकनं तिच्या आईला सांगितलं की ती सलमान खानच्या सेटवर जाणार आहे. तेव्हा तिच्या आईला प्रचंड आनंद झाला. तर त्याविषयी सांगताना पलक म्हणाली की या मागे त्यांचा असलेला हेतू म्हणजे मुलींची सुरक्षा आहे. सेटवर बरेच अनोळखी पुरुष वावरत असतात, त्यामुळे प्रत्येकावर पूर्ण विश्वास टाकणं त्यांना जमत नाही. त्यामुळे सेटवरील मुलींच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी हा नियम केला आहे.'
हेही वाचा : 'माझं तुझ्यावर खूप प्रेम होतं आणि...', लोकप्रिय मराठी अभिनेत्री Apurva Nemlekar च्या जवळच्या व्यक्तीचे निधन
दरम्यान, 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात सलमान खान, पलक तिवारी, पूजा हेगडे शहनाज गिल, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल आणि भूमिका चावला, दाक्षिणात्य सुपरस्टार वेकेंटश दग्गुबाती यांच्या भूमिका आहेत. तर हा चित्रपट 21 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.