प्रसिद्ध कॉमेडियनं घेतला जगाचा निरोप, कपिला शर्मा म्हणाला...

किंग ऑफ कॉमेडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रसिद्ध कलाकाराचं कॅन्सरने जर्मनीमध्ये निधन

Updated: Oct 2, 2021, 06:56 PM IST
प्रसिद्ध कॉमेडियनं घेतला जगाचा निरोप, कपिला शर्मा म्हणाला... title=

मुंबई: पाकिस्तानसह भारताला आपल्या कॉमेडीने वेड लावणाऱ्या दिग्गज कलाकाराने जर्मनीमध्ये अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 66 व्या वर्षी कर्करोगानं निधन झाल्याची माहिती मिळाली आहे. लेजेन्ड्री कॉमेडियन म्हणून ओळख असलेल्या उमर शरीफ यांचं निधन झालं आहे. उमर शरीफ यांच्यावर कॅन्सरचे उपचार सुरू होते. 

कपिल शर्माने ट्वीट करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उमर शरीफ यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. आपल्या विनोदातून जगभरातील लोकांना खळखळून हसवणाऱ्या उमर शरीफ यांचं निधन झालं आहे. 

वयाच्या 66 व्या वर्षी ते कॅन्सरशी झुंज देत होते. त्यांना उपचारासाठी एअर अॅम्बुलन्सद्वारे वॉशिंग्टन इथे घेऊन जात होते. त्याच दरम्यान त्यांची तब्येत बिघडली. जर्मनी इथे एअर अॅम्बुलन्सचं आपात्कालीन लॅण्डिंग करावं लागलं. त्यांनी जर्मनीमध्ये अखेरचा श्वास घेतला आहे. 

पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, उमर शरीफ त्यांची पत्नी जरीन गझल यांच्यासोबत एअर अॅम्ब्युलन्समध्ये अमेरिकेला जात होते. मात्र त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना बुधवारी जर्मनीच्या नूर्मबर्ग रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. तीन दिवसांनंतर त्यांना पुन्हा अमेरिकेत अमेरिकेत उपचारासाठी घेऊन जाण्यात येणार होतं. मात्र त्यापूर्वीच त्याचं निधन झालं. 

द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमध्ये उमर शरीफ हे जज म्हणून दिसले होते. नवजोत सिंह सिद्धू आणि शेखर सुमन यांच्यासोबत त्यांनी काम केलं होतं. 1989 मध्ये बकरा- किश्तों में, बुड्ढा घर पर है सारख्या स्टेज प्लेमधून त्यांचं नाव घराघरात पोहोचलं होतं.