'पद्मावत' सिनेमाची बॉक्स ऑफिसवर चलती, १०० कोटींच्या पुढे गल्ला

संजय लीला भन्साळींच्या वादग्रस्त पद्मावत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चार दिवसांमध्ये ११४ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Updated: Jan 30, 2018, 11:53 PM IST
'पद्मावत' सिनेमाची बॉक्स ऑफिसवर चलती, १०० कोटींच्या पुढे गल्ला title=
Pic Courtesy: Movie Still

मुंबई : संजय लीला भन्साळींच्या वादग्रस्त पद्मावत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चार दिवसांमध्ये ११४ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

'खलीबली' तुफान व्हायरल

आता या सिनेमाचं 'खलीबली' हे गाणं प्रदर्शित झालं असून अवघ्या काही तासांमध्ये हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालंय. संजय लीला भन्साळींनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं शिवम पाठकनं गायलंय. या गाण्यात रणवीर सिंह भन्नाट थिरकलाय. 

पेशव्यांना 'वाट लावली'वर नाचवलं

भन्साळींनी बाजीराव-मस्तानीमध्ये पेशव्यांना 'वाट लावली' गाण्यावर नाचवल्यानंतर आता पद्मावतमध्ये अल्लाऊद्दीन खिल्जीला 'खलीबली' गाण्यावर नाचवलंय. गणेश आचार्यनं या गाण्याची कोरिओग्राफी केलीयं.