मुंबई : लेखक चेतन भगत यांच्यावरही #METOO मोहिमेदरम्यान लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. लेखिका ईरा त्रिवेदी यांनी भगत यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. मात्र भगत यांनी इरा यांचा २०१३ रोजी आलेला ईमेल आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. तसेच आता तुम्हीच सांगा कुणाला कुणाचा किस घ्यायचा आहे ? असा सवाल भगत यांनी विचारला आहे.
ईमेलमध्ये ईरा यांनीच 'मिस यु, किस यु 'असं लिहिलं आहे. त्यामुळे आपल्यावरील आरोप खोटं असल्याचं चेतन भगत यांनी म्हंटलंय. तसेच या मोहिमेचा चुकीचा वापर करु नका, असं आवाहन चेतन भगत यांनी केलं आहे.