Billie Eilish : अमेरिकीची लोकप्रिय गायिका बिली इलिश विषयी तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. फक्त 22 वर्षांची असलेल्या बिली इलिशला 2 ऑस्कर पुरस्कार मिळाले. तिला 9 ग्रॅमी पुरस्कार देखील मिळाले आहेत. तर तिच्या नावावर 2 गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड देखील आहेत. तर या महिन्याच्या सुरुवातीला बिली इलिश ही कोचेला म्यूजिक वॅली फेस्टिव्हलमध्ये देखील दिसली. त्यावेळी तिनं दमदार परफॉर्मन्स केला. यावेळी असं काही झालं की ते पाहून सगळ्यांना आश्चर्य झालं. यावेळी कॉन्सर्टमध्ये बिली इलिशनं स्टेजवरच YouTuber Quenlin Blackwell किस केलं. त्यानंतर तिच्या लैंगिकतेवर चर्चा करत आहेत. त्यानंतर आता स्वत: बिली इलिशनं त्यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे. तिनं सांगितलं की तिला मुलं नाही तर मुली आवडतात.
बिली इलिश लवकरच 'लंच' हे तिचं नवीन गाणं रिलीज करणार आहे. या गाण्याचा टीझर तिनं कोचेला म्युझिक व्हॅली फेस्टिव्हलमध्ये स्टेजवरून तिच्या चाहत्यांना ऐकवला. मात्र या, गाण्याचे बोल ऐकल्यानंतर, लोकं वेगवेगळे तर्क वितर्क लावू लागले. बिली इलिशला मुली आकर्षक करतात असा निष्कर्ष तिच्या गाण्याचे बोल ऐकून लोकांनी लावला, कारण या गाण्यात ती म्हणते, "मी त्या मुलीला लंचमध्ये खाऊ शकते , तिची टेस्ट अशी आहे कि माझं मन कधीच तृप्त होणार नाही''
या गाण्याचं बोल ऐकता बिली इलिशचं हे गाणं स्त्रियांच्या प्रेमात असण्याबद्दल भाष्य करते. आता 'रोलिंग स्टोन'ला दिलेल्या एका नवीन मुलाखतीत बिली म्हणाली की, "हे गाणं खरं तर त्या गोष्टीचा एक भाग होता जी मी खरोखर आहे. तर, मी या गाण्याचे बोल तेव्हा लिहिले होते जेव्हा मी कोणत्याही मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये नव्हते, मी आयुष्यभर मुलींच्या प्रेमात होते आणि मी कोण आहे हे मला गेल्या वर्षीच कळले."
बिलीनं पुढे सांगितलं की, तिला मुलींसोबत शारीरिक संबंध ठेवायला आवडतं. मास्टरबेट हा 'स्वतःचा शोध घेण्या'शी असतं असं ती म्हणते. बिली इलिश म्हणाली की, "जेव्हा मी हे करते, तेव्हा मी माझ्या शरीराशी खरोखरच सखोल संबंध निर्माण करते. हे माझ्या शरीरावर असलेलं प्रेम आहे ज्याची मला असदशी कधीच जाणीव झाली नव्हती."
हेही वाचा : सलमाननं संपवला संजय लीला भन्साळीसोबतचा वाद! ‘हीरामंडी’ च्या प्रीमियरला दिसला भाईजान
गेल्या वर्षी, बिलीला व्हरायटी मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीनंतर लैंगिकतेबद्दलच्या टिप्पण्यांबद्दल टीकेचा सामना करावा लागला. तिच्या शब्दांचा चुकीचा अर्थ कसा लावला गेला याबद्दल तिने निराशा व्यक्त केली आणि स्पष्ट केलं की तिच्या लैंगिकतेबद्दल सार्वजनिकपणे चर्चा व्हावी अशी तिची कोणतीही इच्छा किंवा प्लॅनिंग नव्हती. उलटसुलट प्रतिक्रिया असूनही, ती तिच्या संगीताच्या करिअरवर लक्ष केंद्रित करते.