Oscar 2023: ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. त्यामुळे सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे ऑस्कर (Oscar Award Ceremony) सोहळ्यात कोणाकोणाला पुरस्कार मिळणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले आहे. त्यातून यंदाचं हे वर्षही खास राहणार आहे. या मंचावरून असे अनेक क्षण टिपले गेले आहेत ज्यानं अनेकांची आयुष्यही उजळवली आहेत. त्यातला असाच एक प्रसंग आहे तो म्हणजे दिवंगत ज्येष्ठ अभिनेते चार्ली चॅपलिन (Vetern Actor Charlie Chaplin) यांचा. चार्ली चॅपलिन यांनी गेली अनेक वर्षे अभिनयक्षेत्रात मोलाचे काम केले आहे. त्यांनी जगभरातील प्रेक्षकांना खळखळवून हसवलं आहे. त्यामुळे त्यांची सर्वत्र ख्याती ही अजरामर आहे. त्यांनी ऑस्कर सोहळ्यात उपस्थितीत लावली होती. त्यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला होता. यावेळी त्यांना सर्वात मोठी स्टॅण्डिंग ओवेशन (Oscar Honors) मिळाली होती. (Oscar Award 2023 When vetern actor and director charlie chapli got the longest standing ovation at oscars in 1972)
हा सोहळा होता 1972 सालतला. तेव्हा आपल्याकडे दुरदर्शनची हळूहळू सुरूवात होत होती. चार्ली चॅपलिन (Charlie Chaplin Movies) हे एक असं व्यक्तिमत्त्व होतं की ज्यांनी फक्त त्यांच्या अभिनयानंच नाही तर त्यांनी त्यांच्या विचारांनी आणि त्यांच्या लाघावी व्यक्तिमत्वानं सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली होती. ज्याचा उल्लेख ऑस्करकडूनही करण्यात आला होता. त्यामुळे येत्या ऑस्कर 2023 निमित्ताने चार्ली चॅपलिन यांच्या या क्षणाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही हा व्हिडीओ पाहिलात का?
हा व्हिडीओमध्ये (Video) तुम्ही पाहू शकता की वृद्ध चार्ली चॅपलिन हे काळ्या सूटात आलेले आहेत. समोर जमलेल्या लोकांकडे पाहून ते गहिवरून जातात. त्यांची स्टेजवर एन्ट्री होताच त्यांच्यासाठी जोरजोरात टाळ्या वाजू लागतात. तेवढ्यातच लोकं त्यांच्यासाठी स्टॅण्डिंग ओवशन देतात. त्यांच्यासाठी उभे राहिलेले प्रेक्षक हे त्यांच्याकडून पाहून टाळ्या वाजवणं थांबवत नाहीत. साधारण एक मिनिटं प्रेक्षक उभे राहून त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतात. त्यामुळे चार्ली चॅपलिनंही फार हळवे होतात. ते म्हणतात, माझ्यासाठी हा एक अतिशय हलवा क्षण आहे. यावेळी मला काय बोलायचे ते सुचत नाहीये. तुम्ही गोड सुंदर लोकांनी मला येथे बोलावलेत आणि माझा सन्मान केलात यासाठी मी तुमचा ऋणी आहे, अशा आपल्या भावना ते यावेळी व्यक्त करताना दिसतात.
(व्हिडीओ - ऑस्कर)
ऑस्कर पुरस्कार सोहळा 2023 सुरू होयला काही तासच उरले आहेत. तेव्हा सध्या सगळीकडे ऑस्करच्या आठवणीही ताज्या होताना दिसत आहेत. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात भारतीयांचा डंका वाजणार का याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.