'ही बाई कोण आहे?', शाहरुखच्या 'या' अभिनेत्रीवर भडकला Orry; जाणून घ्या नेमकं काय घडलं

Orry slams Suchitra Krishnamoorthi : सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शाहरुखच्या सुचित्रा कृष्णमूर्तिवर भडकला ऑरी 

दिक्षा पाटील | Updated: Jan 6, 2024, 11:55 AM IST
'ही बाई कोण आहे?', शाहरुखच्या 'या' अभिनेत्रीवर भडकला Orry; जाणून घ्या नेमकं काय घडलं title=
(Photo Credit : Social Media)

Orry slams Suchitra Krishnamoorthi : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानसोबत कभी हॉं कभी ना या चित्रपटात अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्ति दिसली होती. तर सुचित्रानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत असं काही वक्तव्य केलं की जे ऐकल्यानंतर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ऑरीनं संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. खरंतर ऑरीविषयी सुचित्रा कृष्णमूर्तीनं जी कमेंट केली ते कळल्यानंतर ऑरीनं फक्त संताप व्यक्त केला नाही तर त्यानं ही महिला कोण असा सवाल देखील केला आहे. 

सुचित्रा कृष्णमूर्ति यांनी नुकतीच दिलेल्या एनडीटीव्हीला एक मुलाखत दिली होती. त्यावेळी त्यांनी 'ऑरी कल्चर' अशी एक टर्म वापरली. त्याशिवाय 'ऑरी कल्चर हे खूप धोकादायक आहे.' त्यांनी केलेलं हे वक्तव्य ऐकल्यानंतर ऑरी संतापला आहे. ऑरीनं सुचित्रा कृष्णमूर्ति यांच्या मुलाखतीची पोस्ट त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून शेअर केली आहे. तर ही पोस्ट शेअर करत ऑरी म्हणाला, 'कोण आहे ही महिला? आणि हे ऑरी कल्चर काय आहे? नक्की सुरु काय आहे? आणि ही नेहमी माझ्याविषयीच का बोलत असते? मी सध्या खूप गोंधळलोय. मी या महिलेला कधी भेटलोपण नाही आणि कोणाच्या मित्र-मैत्रिणीनं काही म्हटलं तर ती काय हेडलाइन होते? असेच आणखी प्रश्न आहेत, जे माझा पाठलाग सोडत नाहीत आणि रात्रभर झोपू देत नाहीत.' 

Orry slams Suchitra Krishnamoorthi over her orry culture statement says who is this lady

कसं सुरु झालं हे संपूर्ण प्रकरण? 

दरम्यान, सुचित्रा कृष्णमूर्तिनं तिच्या ट्विटर म्हणजेच एक्स अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली होती. त्यात लिहिले होते की यामध्ये त्या उधळपट्टी दाखवून लोकांचे लक्ष वेधून घेण्याच्या 'अश्लील संस्कृती'बद्दल बोलत होत्या. एकदा ती म्हणाली, 'इतर लोकांसमोर ब्रॅंड्सचा मोठेपणा दाखवणे... ज्यातून प्राइट टॅग हा मुद्दा आहे हे कळतं. हे फक्त स्टेटस दाखवण्यासाठी असल्यामुळे आणि श्रीमंत लोक ते करतात. माझ्या मते ही असुरक्षितता आणि स्वतःची ओळख नसणे हे दाखवते. हा भ्याडपणा आहे. आज मला हे का आठवलं? कारण मी माझ्या माजी पर्सनल ट्रेनरला पुन्हा भेटले, एका महिलेने डिझायनर बॅग विकत घेण्यासाठी कर्ज घेतले होते, कारण तिला तिच्या सेलिब्रिटी क्लायंटसमोर कमीपणा वाटू नये.'

हेही वाचा : Age Difference मुळे अरबाज ट्रोलर्सच्या निशाण्यावर, दुसऱ्या पत्नीसोबतच्या त्या व्हिडीओवरून चर्चा

ऑरीविषयी बोलायचे झाले तर तो गेल्या काही दिवसांपासून पलक तिवारीसोबत असलेल्या त्याच्या वादामुळे चर्चेत आहे. त्या दोघांमधील व्हॉट्सअॅप चॅट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले.