'तिच्या नवऱ्याचं आणि माझं...'; अविवाहित अभिनेत्रीच्या 'लग्ना'बद्दल ओरीचा धक्कादायक खुलासा

Orry About Shruti Haasan: बॉलिवूडमधील पार्ट्यांमुळे आणि त्यामधील फोटोंमुळे मागील काही काळापासून इंटरनेटवर सातत्याने चर्चेत असलेल्या ओरीने एक मोठा दावा केला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 26, 2023, 03:00 PM IST
'तिच्या नवऱ्याचं आणि माझं...'; अविवाहित अभिनेत्रीच्या 'लग्ना'बद्दल ओरीचा धक्कादायक खुलासा title=
सोशल मीडियावर प्रतिक्रिया नोंदवताना केला खुलासा

Orry About Shruti Haasan: ओरहान अवतारमणी उर्फ ओरी हा मागील काही काळापासून सातत्याने चर्चेचा विषय ठरतोय. ओरीने नुकतेच काही मोठे खुलासे सोशल मीडियावरुन केले आहेत. रेडीटवरील चर्चेदरम्यान ओरीने एका अभिनेत्रीचं लग्न झाल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते कमल हसन यांची कन्या श्रृती हसनचं लग्न झाल्याचा दावा ओरीने केला आहे. ओरीने श्रृती हसन विवाहित असून एका कार्यक्रमादरम्यान तिने माझ्याशी फार वाईट प्रकारे वर्तवणूक केली होती, असा दावाही केला आहे.

सोशल मीडियावर नोंदवली प्रतिक्रिया

ख्रिसमसदरम्यान ओरीने 'आस्क मी एनिथिंग' अंतर्गत चाहत्यांसी संवाद साधला. रेडिटवर चाहत्यांनी बोलताना एकाने तुझ्याबरोबर गरज नसताना वाईटप्रकारे वागलेला एखादा कलाकार तुला आठवतो का? म्हणजे तुझ्यासोबत फोटो काढताना त्याने तुला फार तुच्छ वागणूक दिली आहे असं कोणी आहे का? असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना ओरीने श्रृती हसनचं नाव घेतलं. श्रृती माझ्याबरोबर फार उद्धटपणे वागली होती, असं सांगितलं. आपण एका कार्यक्रमासाठी गेलो होतो. त्या ठिकाणी श्रृती होती. मात्र मी तिला ओळखत नव्हतो. मी तिला फोटो काढण्यासंदर्भातही विचारणा केलेली नव्हती. असं असतानाही ती माझ्याशी फार वाईट प्रकारे वागली, असा आरोप ओरीने केला आहे.

नेमकं काय म्हणाला?

"श्रृती हसन माझ्याशी वाईटप्रकारे वागली होती. मी तिला फोटोसाठी विचारलंही नव्हतं. ती माझ्याशी फार वाईट प्रकारे वागली, मी तिला ओळख नसतानाही अशी वागणूक मला मिळाली. मला फार वाईट वाटलं. मात्र ते कदाचित गैरसमजामुळे घडलं असावं. तिच्या नवऱ्याचं आणि माझं फार चांगलं जमतं. मला त्याचा फार कौतुकही वाटतं. हा वाद लवकरच संपेल. मात्र मी एकाकडून असं ऐकलं आहे की ती मला 'पुण्यातील स्पॉट बॉय की काय' असं काहीतरी म्हणालीय," अशी प्रतिक्रिया ओरीने दिली आहे.

सोशल मीडियावर चर्चा

ओरीची ही प्रतिक्रिया व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर एकच कल्लोळ माजला. यामागील मुख्य कारण म्हणजे श्रृती हसन ही अविवाहित असून अद्याप तिने तिच्या लग्नाबद्दल कोणताही खुलासा केलेला नाही. श्रृती ही कलाकार शंतनू हजारिकाबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. अनेकदा हे दोघे एकमेकांबरोबरचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. मात्र आमच्या दोघांचं इतक्यात काही लग्न होणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Orhan Awatramani (@orry1)

लग्न शब्दाची वाटते भीती

एका मुलाखतीमध्ये श्रृतीने मला लग्न शब्दाची फार भीती वाटते असं म्हटलं होतं. आमचं नातं हे लग्न झालेल्या इतर कोणत्याही जोडप्यापेक्षा फारच उत्तम आहे, असं श्रृतीने शंतनूबरोबरच्या नात्याबद्दल म्हटलं होतं.