न्यासा देवगण नव्हे, कोणा भलत्याच अभिनेत्रीसोबत फिरतोय ऑरी; Private Photos व्हायरल

Orhan Awatramani and Bhumi Pednekar in London: सध्या इंटरनेटवर कोणाची जास्त चर्चा रंगली असेल तर ती व्यक्ती म्हणजे ऑरी याची. सध्या सेलिब्रेटींमधील ऑरी हे सर्वात लोकप्रिय नावं आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली दिसते. आता तो न्यासा देवगण नाही तर या लोकप्रिय अभिनेत्रीसोबत स्पॉट झाला आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Jun 23, 2023, 02:06 PM IST
न्यासा देवगण नव्हे, कोणा भलत्याच अभिनेत्रीसोबत फिरतोय ऑरी; Private Photos व्हायरल title=
June 23, 2023 | Orhan Awatramani spotted with bhumi pednekar in london with cozy and romantic private photos (Photo: Instagram)

Orhan Awatramani and Bhumi Pednekar in London: अनेकदा सोशल मीडियावर चर्चा असते ती म्हणजे सेलिब्रेटी आणि त्यांच्या पार्टीशार्टीची. त्यातून कोण कोणासोबत कधी आणि कुठे जातं याबद्दलही त्यांच्या चाहत्यांना जाणून घ्यायची उत्सुकता असते. अशातच आता चर्चा रंगली आहे ती म्हणजे ऑरीची. ऑरी (Orhan Awatramani) नावाचा हा सेलिब्रेटी सध्या सगळीकडेच चांगलाच झळकतो आहे. त्याच्याबद्दल माध्यमांतून सातत्यानं काही ना काही समोर येताना दिसतेच आहे. तो अनेक सेलिब्रेटींसोबत फिरताना दिसतो. खासकरून सेलिब्रेटी स्टार कीड्ससोबत त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. मध्यंतरी तो न्यासा देवगणसोबत (Nysa Devgan) चांगलाच फिरताना दिसत होता. त्या दोघांचे फोटो सारखे व्हायरल होत होते. काहीच दिवसांपुर्वी ते दोघं लंडनमध्ये एका नाईट क्लबमध्ये पार्टी करताना दिसले होते. 

त्यापुर्वी अंबानींनीची होणारी सून राधिका मर्चेंट आणि मित्रपरिवारासोबत स्पॉट झाला होता. त्यामुळे तेव्हाही त्याची विशेष चर्चा रंगली होती. आता ऑरी आपल्या लाडक्या फ्रेंडसोबत स्पॉट झाला आहे. यावेळी त्यानं अभिनेत्री भुमी पेडणेकरसोबत पार्टीचा आनंद घेतला आहे. यावेळी तोही फार एकमेकांसोबत कॉझी झाल्याचा दिसत आहे. यावेळी ऑरीनं इतके महागडे कपडे घातले होते की तुम्हाला त्याची कल्पनाही येणार नाही. आपण स्वप्नातही विचार करणार नाही एवढे हटके आणि महागडे कपडे त्यानं यावेळी परिधान केले होते. त्यामुळे त्याच्या या आऊटफिटची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. तुम्हाला माहितीये का की हे कपडे नक्की किती महाग होते आणि कोणत्या ब्रॅण्डचे होते? 

यावेळी ऑरीनं व्हाईट कलरचा टी आणि जीन्सची शॉर्ट घातली होती. त्याच्या शॉर्ट पॅंटवर डायमंडसारखे डिझाईनही होते. त्यामुळे त्याच्या या कपड्यांची चांगलीच चर्चा रंगली होती. परंतु तुम्ही त्याच्या या साध्या कपड्यांवर जाऊ नका. त्याच्या या कपड्यांची किंमत ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. यावेळी भूमी आणि ऑरीचे फोटो चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. यावेळी ते एका कॅफेमध्येही स्पॉट झाले आहेत. त्याचसोबत त्यांनी यावेळी एकत्र पार्टीही केली आणि सोबतच त्यांनी एकत्र वेळही घालवला. त्यामुळे त्यांच्या या व्हायरल होणाऱ्या फोटोंवर नेटकऱ्यांच्या नानातऱ्हेच्या कमेंट्सही येताना दिसत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

समोर आलेल्या माहितीनुसार, डायमंड शर्टची किंमत ही 1,40,000 रूपये इतकी आहे जो डीओर या ब्रॅण्डचा आहे. सोबतच त्यानं किट टॅंक घातली आहे ज्याची किंमत 2,700 रूपये इतकी आहे आणि हा ब्रॅंड झारा आहे. तर त्यानं जी डेनिम शॉर्ट्स घातली होती ती लुईसव्यूईटनची होती ज्याची किंमत ही 1,90,000 रूपये इतकी आहे. सोबतच त्याचे ट्रेनर्स हे बालेनशियागाचे होते ज्याची किंमत 90,000 रूपये आहे.