बॉलिवूडची बेबो अर्थात करीना कपूर खाननं या चित्रपटसृष्टीत 25 वर्ष पूर्ण केले आहेत. करीना ही कपूर कुटुंबातून असली तरी देखील तिचं फिल्मी करिअर हे खूप मजेशीर आहे. खरंतर करीनाला पहिल्याच चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्यानंतर हळू-हळू तिनं एकामागे एक हिट चित्रपट देत स्वत: चं करिअर बनवलं. करीनानं या क्षेत्रात 25 वर्ष पूर्ण केली आहेत. इतकंच नाही तर तिनं लोकप्रियता पाहता स्वत: च्या मानधनात देखील वाढ केली आहे.
करीना कपूरचा पहिला चित्रपट हा रेफ्यूजी होता पण तिनं दुसराच चित्रपट साइन केला होता. राकेश रोशनचा चित्रपट 'कहो ना प्यार' मध्ये हृतिक रोशनसोबत कास्ट करण्यात आलं होतं. चित्रपटाचं शूटिंग देखील सुरु झालं होतं. त्यांचे काही फोटो देखील व्हायरल झाले होते. पण अचानक करीनाला या चित्रपटात अमीशा पटेलनं रिप्लेस केलं. सगळ्यात आधी ही माहिती आली की करीनानं हा चित्रपट सोडला होता. मात्र, अमीषा पटेलनं एका मुलाखतीत दावा केला की काही मतभेदांमुळे राकेश रोशननं करीनाला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.
रिफ्यूजी या चित्रपटातून करीनाच्या करिअरला हळू सुरुवात झाली. अभिषेक बच्चनसोबत या चित्रपटात काम केल्यानंतर करीनाला कोणताही बूस्ट मिळाला नाही. मात्र, त्यानंतर तिला एकामागे एक चित्रपट मिळत गेले. यादें या चित्रपटात तिनं खूप चांगलं काम केलं. दरम्यान, करण जोहरच्या 'कभी खुशी, कभी गम' या चित्रपटातील पू या भूमिकेमुळे करीनाला एक वेगळी ओळख मिळाली. या चित्रपटातील तिची पू ही भूमिका त्यावेळी मुलींमध्ये खूप हिट झाली होती. त्याचवेळी करीनाची क्रेझ खूप जास्त वाढली होती. त्यानंतर करीनानं एका मुलाखतीत सांगितलं की पू आणि त्यानंतर गीतच्या भूमिकेला मागे टाकण्यासाठी तिला खूप मोठा काळ लागला. आज करीना चित्रपटातील एका गाण्यासाठी जवळपास 1.5 कोटी मानधन घेते.
हेही वाचा : 'प्यार का पंचनामा 3' येतोय मात्र कार्तिक आर्यनच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी?
करीनाच्या कामाविषयी बोलायचं झालं तर तिनं चमेली, ओमकारा, जब वी मेट, उडता पंजाबसारख्या चित्रपटांमध्ये करीनानं तिच्या अभिनयाची जादू केली. हे सगळे चित्रपट वेगवेगळ्या धाटणीचे होते आणि करीनानं सगळ्याच भूमिकांमधून तिच्या अभिनयाची छाप सोडली. तर आता तिचा द बकिंघम मर्डर्स हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. याच चित्रपटातून करीनानं निर्माती म्हणून देखील पदार्पण केलं आहे. एकता कपूरसोबत मिळून तिनं या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन हंसल मेहता यांनी केले आहे.