सहकलाकाराच्या पत्नीसोबत मस्करी करणं अजय देवगणला पडलेलं महागात, तिनं केलेला आत्महत्येचा प्रयत्न

Ajay Devgn : अजय देवगणनं एका मुलाखतीत त्याच्या प्रॅंकमुळे कसा एका सहकलाकाराच्या पत्नीचा जीव धोक्यात आला होता हे सांगितलं...

दिक्षा पाटील | Updated: Apr 1, 2024, 11:28 AM IST
सहकलाकाराच्या पत्नीसोबत मस्करी करणं अजय देवगणला पडलेलं महागात, तिनं केलेला आत्महत्येचा प्रयत्न title=
(Photo Credit : Social Media)

Ajay Devgn : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. अजयनं त्याच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. इतकंच नाही तर त्याच्या दर्जेदार कामानं प्रेक्षकांची मने जिंकली. अजय देवगण हा त्याच्या सीरियस पर्सनॅलिटीसाठी ओळखला जातो. पण तुम्हाला माहितीये का? की अजय देवगण हा सेटवर मस्ती करतो याचे अनेक किस्से आहेत. दरम्यान, आता त्याचा आणखी एक किस्सा समोर आला आहे. त्यामुळे त्याला ट्रोल करण्यात येत आहे. 

अजय देवगनचे सहकलाकार हे नेहमीच तो सेटवर किती मस्ती करतो याचे किस्से सांगताना दिसतो. तर 2018 मध्ये मिड डेला दिलेल्या एका मुलाखतीत अजय देवगणनं आश्चर्यचकीत होणारा एक किस्सा सांगितला होता. अजयनं सांगितलं की एकदा त्याचा एक प्रॅंक हा मजेशीर होण्याच्या जागी उल्टा झाला. अजय हा किस्सा सांगत म्हणाला की 'अनेक वर्षांपूर्वी त्याच्या प्रॅंकमुळे कोणाचा जीव जाता-जाता वाचला.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अजयनं पुढे सांगितलं की "त्याच्या सहकलाकाराची पत्नी चित्रपटसृष्टीच्या बाहेरची होती. ती एक सिंपल, छोट्या शहरातील मुलगी होती. आम्ही रात्री शूटिंग करत होतो. ती सकाळी तिच्या नवऱ्याला भेटायची. तर आम्ही तिला सांगितलं की तिच्या पतीचं दुसऱ्या कोणासोबत तरी अफेयर सुरु आहे आणि रात्री तो कुठे तरी जातो. आम्ही रात्री कोणतंच शूटिंग करत नाही. मी तिला सांगितलं होतं की मी रात्री 10.30 वाजता माझ्या रुमवर येतो." 

हेही वाचा : हृतिक रोशनची गर्लफ्रेंड EX पत्नी बेस्ट फ्रेंड्स! एकमेकांना 'या' नावानं मारतात हाक

अजय पुढे म्हणाला की, "ती मला बोलत होती की तिला माझ्या प्रॅंक्सविषयी माहित आहे. तिला तिच्या नवऱ्यावर विश्वास आहे. आम्ही जवळपास आठ दिवस असा प्रॅंक केला. नवव्या दिवशी आम्ही उठलो आणि आम्हाला कळलं की तिनं खरंच गोळ्या खाल्ल्या आहेत. आम्ही घाबरलो, तिला लगेच रुग्णालयात घेऊन गेलो. ती पूर्णवेळ तिच्या नवऱ्याशी या गोष्टीवरुन भांडत होती, त्याला विचारायची की तो काय करतोय." अजयची ही मुलाखत रेडिटवर पुन्हा एकदा व्हायरल होत आहे आणि नेटकऱ्यांनी त्याच्या या प्रँकला असंवेदनशील म्हणतं त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एक नेटकरी म्हणाला की ही वीप दासची पत्नी आहे आणि तो ज्या चित्रपटाविषयी बोलत आहे तो शिवाय आहे त्यासाठी तो 2015 मध्ये शूटिंग करत होता.