हृतिक रोशनची गर्लफ्रेंड EX पत्नी बेस्ट फ्रेंड्स! एकमेकांना 'या' नावानं मारतात हाक

Hrithik Roshan's Girffriend and Ex wife are best friends : हृतिक रोशनच्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीतील एकमेकांचे फोटो शेअर करत सबा आणि सुझैन म्हणाल्या...

दिक्षा पाटील | Updated: Apr 1, 2024, 10:26 AM IST
हृतिक रोशनची गर्लफ्रेंड EX पत्नी बेस्ट फ्रेंड्स! एकमेकांना 'या' नावानं मारतात हाक title=
(Photo Credit : Social Media)

Hrithik Roshan's Girffriend and Ex wife are best friends : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन त्याची गर्लफ्रेंड सबा आजाद आणि त्याची पुर्वाश्रमीची पत्नी सुझैन खानमध्ये चांगली मैत्री आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. दोघं सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करताना दिसतात. इतकंच नाही तर एकत्र पार्टीमध्ये देखील दिसतात. नुकताच हृतिक आणि सुझैननं त्यांचा मुलगा हृहान रोशनचा 18 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी सुझैन खाननं सबासोबत एक फोटो देखील शेअर केला. त्या फोटोत त्या दोघांचं बॉन्ड पाहायला मिळत आहे. सबानं सुझैनचे आभार मानले आहे. 

सेलिब्रेशन झाल्यानंतर सुझैननं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सबा आझादचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत सुझैननं कॅप्शन दिलं की सबा तू दिलेल्या प्रेमासाठी आणि सनशाइनसाठी धन्यवाद डार्लिंग साबू... तर हाच फोटो परत शेअर करत सबानं कॅप्शन दिलं की आतापर्यंत मिळालेल्या सगळ्या चांगल्या प्रकारे मी वेळ घालवला त्यासाठी माझ्या सूझचे आभार. त्या दोघांनी शेअर केलेले हे फोटो पाहिल्यानंतर सोशल मीडियावर त्या दोघींच्या बॉन्डची चर्चा सुरु आहे. इतकंच नाही तर त्या दोघींनी एकमेकांना टोपन नावं देखील दिली आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सुझैन आणि सबाचे फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एक नेटकरी म्हणाला, "सवत मैत्रीणी." दुसरा नेटकरी म्हणाला, "आमच्याकडे जर एक्स आणि सध्याची गर्लफ्रेंड एकत्र पार्टी करायला गेले तर केस ओढण्यापासून शिवीगाळ आणि हानामारी पर्यंत पोहोचतं." तिसरा नेटकरी म्हणाला, "आजकालचे लोक काही जास्तच प्रॅक्टिकल झाले आहेत." आणखी एक नेटकरी म्हणाला, "ही कोणत्या प्रकारची मच्युअरीटी आहे." दुसरा नेटकरी म्हणाला, "कधी सवत कधी मैत्रिणी." 

हेही वाचा : अखेर जान्हवीच्या होण्याऱ्या नवऱ्याबाबत बोनी कपूर यांचा खुलासा, म्हणाले...

दरम्यान, हृतिक आणि सुझैनविषयी बोलायचे झाले तर अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 2000 मध्ये त्यांनी लग्न केलं. त्या दोघांना दोन मुलं असून हृहान आणि हृदान अशी त्यांची नावं आहेत. तर लग्नाच्या 13 वर्षांनी म्हणजेच 2013 मध्ये ते दोघं विभक्त झाले. ते आता विवाहबंधनात नसले किंवा पती-पत्नी नसले तरी देखील ते चांगले मित्र आहेत. अनेकदा ते एकत्र फॅमिली ट्रिपवर परत जाताना दिसतात. सुझैनविषयी बोलायचे झाले तर ती सध्या अर्सलान गोनीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. तर हृतिक हा सबा आझादसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.