मुंबई : १९९८ मध्ये रूपेरी पडद्यावर दाखल झालेल्या 'कुछ कुछ होता हैं' चित्रपटाने चाहत्यांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले होते. गडद मैत्रीच्या कथे भोवती फिरणारा हा चित्रपट आता तितकाच प्रसिद्ध आहे. ९० व्या दशकात मैत्रीचे महत्व पटवून देणाऱ्या चित्रपटाने तरूणांना घायाळ केले होते. चित्रपटातील गाण्यांनी तर चांगलाच जोर धरला होता. अभिनेता शाहरूख खान, सलमान खान, अभिनेत्री राणी मुखर्जी, काजोल या कलाकारांनी चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती.
बॉलिवूडचा गॉडफादर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करण जोहरने चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. आता रिमेकच्या जगात 'कुछ कुछ होता हैं' चित्रपट पुन्हा चाहत्यांचे मनोरंजन करणार आहे. सध्या दिग्दर्शक करण जोहरने याबाबतीत कोणत्याही प्रकारची अधीकृत घोषणा केलेली नाही.
मैत्री आणि प्रेममवर आधारलेल्या चित्रपटाच्या दुसऱ्याभागात अभिनेता रणवीर सिंग हा शाहरूख खानची भुमिका साकारणार आहे, तर अभिनेत्री आलिया भट्ट काजोलच्या भुमिकेत झळकणार आहे. राणी मुखर्जीच्या दिलखेक अदांना जान्हवी कपूर न्याय देणार आसल्याचे समोर येत आहे.
मेलबर्नच्या फिल्म फेस्टीवलमध्ये 'कुछ कुछ होता हैं' उत्कृष्ट चित्रपट म्हणून दाखवण्यात आला. या फिल्म फेस्टीवलमध्ये दिग्दर्शक करण जोहर देखील उपस्थित होता.