काजोलच्या 'हेलीकॉप्‍टर इला'चा ट्रेलर रीलिज !

काजोलच्या आज  44 व्या वाढदिवसानिमित्त तिच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. 

Updated: Aug 5, 2018, 03:00 PM IST
काजोलच्या 'हेलीकॉप्‍टर इला'चा ट्रेलर रीलिज ! title=

मुंबई : काजोलच्या आज  44 व्या वाढदिवसानिमित्त तिच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. 'हेलीकॉप्‍टर इला' या सिनेमातून काजोल पुन्हा रसिकांच्या भेटीला येणार आहे.

एका मनमौजी, 17 वर्षीय मुलाच्या सिंगल मदरची भूमिका काजोल 'हेलीकॉप्‍टर इला' या सिनेमामध्ये साकारत आहे. राष्‍ट्रीय पुरस्‍कार विजेता बंगाली अभिनेता ऋद्धि सेन या चित्रपटात काजोलच्या मुलाची भूमिका साकारत आहे.  

माय-लेकाचं नात देणार नव्या काळात पॅरेंटिंगचे धडे 

मुलासोबत शिक्षण पूर्ण करण्यासाठी  माय-लेक म्हणजेच सिनेमात काजोल आणि ऋद्धि एकाच कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन घेतात. मात्र सतत आईचा वावर आसपास असल्याने वैतागलेल्या माय- लेकातील नातेसंबंधांवर या चित्रपटामध्ये भाष्य करण्यात आले आहे. 

काजोल, ऋद्धि सोबत अभिनेत्री नेहा धुपिया या चित्रपटामध्ये खास भूमिकेत दिसणार आहे. अजय देवगणने या सिनेमाची निर्मिती केली आहे. तर प्रदीप सरकारचं दिग्दर्शन आहे. हा सिनेमा रसिकांच्या भेटीला 7 सप्टेंबर 2018 ला
येणार आहे.