नुसरत जहा यांचा प्रेग्नेंसीबद्दल वाद; बेबी बम्पचा फोटो व्हायरल

नुसरत यांच्या फोटोवरून त्या नक्की गरोदर आहेत, असं कळत आहे.

Updated: Jun 12, 2021, 09:36 AM IST
नुसरत जहा यांचा प्रेग्नेंसीबद्दल वाद;  बेबी बम्पचा फोटो व्हायरल  title=

मुंबई : टीएमसी खासदार नुसरत जहां सध्या तुफान चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रेग्नेंसीबद्दल चर्चा रंगत आहे. पण गेल्या ६ महिन्यापासून त्या त्यांच्या पतीपासून दूर असल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. अशात नुसरत यांचा एक फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहे. नुसरत यांच्या फोटोवरून त्या नक्की गरोदर आहेत, असं कळत आहे. नुसरत यांच्या व्हायरल फोटोमध्ये त्यांच्यासोबत अभिनेत्री श्राबंती चटर्जी  देखील दिसत आहे. 

अद्याप नुसरत यांनी त्यांच्या प्रेग्नेंसीवर कोणत्याही प्रकारचा खुलासा केलेला नाही. मीडिया रिपोर्टनुसार अभिनेत्री-खासदार नुसरत जहांचं वैवाहिक जीवन संकटात आलं आहे. यश दासगुप्ता सोबत वाढलेली जवळीक यामुळे नुसरत जहांच्या विवाहित जीवनात अडचणी निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. 

Check Nusrat Jahan's Baby Bump Viral Photo by Zee News

नुसरत जहां आणि यश दासगुप्ता यांची भेट चित्रपटाच्या सेटवर झाली होती. मीडिया रिपोर्टनुसार नुसरत जहां सहा महिन्यांच्या गरोदर आहेत. दोघेही एकमेकांच्या घरी जातात. नुसरत लवकरच निखिलला घटस्फोट घेणार असल्याचं  कळत आहे. 

दरम्यान, २०१९ मध्ये टीएमसीकडून निवडणूक लढवून त्या खासदार झाल्या. बिझनसमन निखील जैन सोबत विवाह केल्यानंतर त्या चर्चेत देखील आल्या. विवाहानंतर तिचे अनेक फोटो समोर आले होते. ज्यामध्ये दोघेही हिंदू आणि मुस्लीम सण साजरा करताना दिसले. मात्र आता त्यांच्या वैवाहिक जीवनात संकट आलं आहे.