मुलाला सोडून बॉयफ्रेंडच्या मिठीत दिसली महिला खासदार, Photo Viral

महिला खासदारचे बॉयफ्रेंडसोबत खास फोटो, सोशल मीडियावर फोटोंमुळे धुमाकूळ   

Updated: Oct 10, 2022, 02:01 PM IST
मुलाला सोडून बॉयफ्रेंडच्या मिठीत दिसली महिला खासदार, Photo Viral  title=

मुंबई : बंगाली अभिनेत्री आणि पश्चिम बंगालमधील टीएमसीच्या खासदार नुसरत जहां (Nusrat Jahan) गेल्या काही दिवसांपासून लग्न आणि प्रेग्नन्सीच्या बातम्यांमुळे चर्चेत राहिल्या आहेत. घटस्फोटानंतर नुसरत जहां याचं नाव अभिनेता यश दासगुप्ता (Yash Dasgupta) सोबत देखील जोडण्यात आलं. एवढंच नाही तर मुलाच्या जन्मानंतर नुसरत जहां यांनी मुलाच्या जन्म प्रमाणपत्रावर यशचं नाव लिहिलं होतं. मुलाच्या वडिलांच्या नावामुळे देखील सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली. ( yash dasgupta with Nusrat Jahan)

अनेक वादाच्या भोवऱ्यात असतानाही नुसरत जहां चाहत्यांना निराश करत नाही. त्या सोशल मीडियावर सतत अ‍ॅक्टिव्ह असतात आणि त्यांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. दरम्यान, नुसरत जहां यांनी पुन्हा एकदा आपले काही फोटो शेअर केले आहेत. (Nusrat Jahan social media)

आता देखील नुसरत जहां यांनी यश दासगुप्तासोबत काही फोटो शेअर केले आहेत. एका खास दिवसाचं निमित्त साधत नुसरत यांनी बॉयफ्रेंडसोबत फोटो पोस्ट केले आहेत. यशसोबत फोटो पोस्ट करत त्यांनी बॉयफ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Nusrat Jahan wish happy birthday yash dasgupta)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सांगायचं झालं तर, नुसरत यांचे  वैयक्तिक आयुष्य नेहमीच वादात राहिले आहे. त्यांचं पहिलं लग्न 2019 मध्ये तुर्कीतील बिझनेसमन निखिल जैनसोबत झालं होतं. पण 2020 मध्ये दोघे वेगळे राहू लागले. दरम्यान, नुसरत गरोदर असल्याची बातमी आली आणि निखिलने सांगितले की, हे मूल त्याचे नाही. (nusrat jahan songs)

यानंतर नुसरतचे नाव यश दासगुप्तासोबत जोडले जाऊ लागले. 2021 मध्ये ऑगस्टमध्ये नुसरत यांनी इशान या मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्म प्रमाणपत्रावर यशचे नाव लिहिले होते. याशिवाय यशच्या वाढदिवशी नुसरत यांनी केकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्यामध्ये त्यांनी यशला पती आणि मुलाचा पिता असल्याचे सांगितलं. (nusrat jahan news)