'नोटबुक' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

सलमान खान नेहमीच अनेकांचा गॉडफादर राहिला आहे. 'नोटबुक' सिनेमात सलमानने नवीन कलाकारांसाठी बॉलिवूडचे दरवाजे उघडले आहेत. 

Updated: Feb 23, 2019, 02:42 PM IST
'नोटबुक' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित title=

मुंबई :  अभिनेता सलमान खानच्या प्रोडक्शनखाली तयार होत असलेल्या 'नोटबुक' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. सलमान खान नेहमीच अनेकांचा गॉडफादर राहिला आहे. 'नोटबुक' सिनेमात सलमानने नवीन कलाकारांसाठी बॉलिवूडचे दरवाजे उघडले आहेत. अभिनेता मनिष बहलची मुलगी प्रनूतन बहल 'नोटबुक' सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. सिनेमात प्रनूतन मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. सिनेमात झहीर इक्बाल सुद्धा डेब्यू करणार आहे. सलमान खानने स्वत: सोशल मीडियावर ट्रेलरचे प्रकाशन केले आहे. तर नोटबुक सिनेमाचा ट्रेलर २ मिनीट ५१ सेकंदांचा आहे.  

 

सिनेमात प्रनूतन शिक्षिकेची भूमिका साकारताना दिसणार आहे. तिने आपल्या नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर इक्बाल तिच्या जागी इक्बाल नोकरी साठी रूजू होतो. सिनेमात या दोघांमध्ये असलेले प्रेम संबंध चाहत्यांना अनूभवता येणार आहे. त्याचप्रमाणे काश्मीरच्या प्रश्नांवरही सिनेमाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला आहे. २९ मार्च रोजी सिनेमा सिनेमागृहात दाखल होणार आहे.  

नुकताच सलमान खानने पाकिस्तानी कलाकार अतिफ असलमला 'नोटबुक' सिनेमातून  काढण्याचे आदेश आपल्या प्रोडक्शन टीमला देऊन गाण्याचे पुन्हा नव्याने रेकॉर्डिंग करण्यास सांगितले होते.  हे गाणं पुन्हा कोण गाणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले  होते, तर हे गाणं खुद्द सलमानच्या आवाजात रेकॉर्ड होणार आहे. सूत्रांनी दिलेल्यामाहिती नुसार अभिनेता सलमान खानच्या प्रोडक्शन खाली तयार होत असलेला सिनेमा 'नोटबुक'च्या टीमने पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबाला 22 लाख रूपये मदत म्हणून देण्याचे घोषित केले त्याचप्रमाणे पाकिस्तानी गायक अतिफ असलमला सिनेमातून बेदखल करण्यात आले आहे.