सैफचा मुलगा नाही तर पलक तिवारी 'या' अभिनेत्याला करतेय डेट

 श्वेता तिवारीची मुलगी अभिनेत्री पलक तिवारी तिच्या लूक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. 

Updated: Jun 24, 2022, 09:37 PM IST
सैफचा मुलगा नाही तर पलक तिवारी 'या' अभिनेत्याला करतेय डेट  title=

मुंबई : श्वेता तिवारीची मुलगी अभिनेत्री पलक तिवारी तिच्या लूक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. हार्डी संधूच्या 'बिजली बिजली' या गाण्याने तिने चाहत्यांच्या हृदयात स्थान निर्माण केलं. त्याचबरोबर, स्टार किड सैफ अली खान आणि अमृता सिंगचा मुलगा इब्राहिम अली खानसोबत पार्टीत दिसल्यानंतर ती त्याच्यासोबतच्या नात्यामुळे चर्चेत आली. त्याचबरोबर पलक तिवारी देखील इब्राहिमसोबत दिसल्यानंतर तिचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न करताना दिसली होती. त्यानंतर ती इब्राहिमला डेट करत असल्याचं सांगण्यात आलं.
 
तथापि, अभिनेत्रीने नंतर डेटिंगच्या अफवांवर स्पष्टीकरण दिलं आणि म्हटलं की, ती आणि इब्राहिम फक्त चांगले मित्र आहेत. त्याचबरोबर तिने मीडियापासून नाही तर आई श्वेता तिवारीला घाबरुन आपला चेहरा लपवला होता. आता रिपोर्ट्सनुसार, असं म्हटलं जात आहे की, ती दुसऱ्या कोणाला तरी डेट करत आहे आणि इब्राहिम अली खानला डेट करण्याच्या अफवा होत्या.

रिपोर्ट्सनुसार, बिजली बिजली गर्ल अभिनेता वेदांग रैनाला डेट करत आहे. वेदांग झोया अख्तरच्या 'द आर्चीज'मधून पदार्पण करत आहे. द आर्चीजचा फर्स्ट लूक टीझर ऑनलाइन आल्यानंतर लोक वेदांगला ओळखू लागले आहेत. वेदांगसोबत आर्चिसमध्ये शाहरुख खानची मुलगी सुहाना खान, श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा यांच्याही भूमिका आहेत.ॉ

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

एका रिपोर्टनुसार, हे कपल दोन वर्षांहून अधिक काळ एकत्र आहेत. दोघंही अनेकदा प्रायव्हेट पार्ट्यांमध्ये एकत्र दिसतात. त्यांच्या जवळच्या लोकांना याची माहिती आहे. पलकची आई श्वेता तिवारीलाही त्यांच्या नात्याबद्दल माहिती आहे आणि ती खूश आहे. अहवालात असंही म्हटलं आहे की, पलक आणि वेदांग यांना त्यांच्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचं आहे. त्यामुळे त्यांचं नाते सार्वजनिक करू इच्छित नाहीत, तर पलकच्या टीमने ही एक दुसरी अफवा असल्याचंही म्हटलं आहे.