स्वत:चं प्रतिबिंब पाहून भारावलेल्या एकनाथ शिंदेंमुळे आज महाविकास आघाडीला धडकी? पाहा 'तो' क्षण

एकनाथ शिंदे यांच्या नावामुळं संपूर्ण वातावरणाला नवी कलाटणी मिळाली आहे

Updated: Jun 21, 2022, 11:17 AM IST
स्वत:चं प्रतिबिंब पाहून भारावलेल्या एकनाथ शिंदेंमुळे आज महाविकास आघाडीला धडकी? पाहा 'तो' क्षण
छाया सौजन्य- सोशल मीडिया

Eknath Shinde : विधानपरिषद निवडणुकांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे बडे नेते आणि मविआमधील मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावामुळं संपूर्ण वातावरणाला नवी कलाटणी मिळाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शिंदे सध्या सुरतमध्ये असल्याचं कळत आहे. 

फक्त शिंदेच नव्हे, तर त्यांच्यासमवेत शिवसेनेचे 21 आमदारही असल्याचं कळत आहे. सत्तेच्या सारीपाटावर आता शिंदे आपल्या सोंगट्या टाकतात का, की आणखी कोणाची खेळी त्यांच्या वरचढ असेल याचीच उत्सुकता आता पाहायला मिळत आहे. 

शिंदे पत्रकार परिषद घेण्यापूर्वीच बरीच माहिती आणि काही फोटो, व्हिडीओ व्हायरल होत आहेत. व्हायरल होणाऱ्या या गोष्टींमध्ये एक व्हिडीओसुद्धा समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एकनाथ शिंदे आपल्याप्रमाणंच दिसणाऱ्या एका कलाकाराला पाहून भारावलेले दिसत आहेत. 

हा व्हायरल होणारा व्हिडीओ आहे, 'धर्मवीर' या चित्रपटाच्या प्रसिद्धीदरम्यानचा. जेव्हा अभिनेता क्षितीज दाते एकनाथ शिंदे यांच्याच रुपात त्यांच्यासमोर आला तेव्हा आपलंच हे रुप पाहून शिंदेही भारावले. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव खूप काही बोलून गेले होते. 

तिथे स्वत: नि:शब्द झालेल्या शिंदेंमुळं सध्या महाविकास आघाडी सरकारला घाम फुटू लागला आहे. भाजपची रणनिती, सत्तेत अपेक्षित भूकंप आणि एकनाथ शिंदे हेच मुद्दे सध्या प्रचंड चर्चेत आहेत. येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात याचीच चर्चा असेल हे म्हणणं गैर ठरणार नाही.  

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x