'बार्बी लूक'मुळे नोराचे चाहते घायाळ, 'पेपेटा' व्हिडिओ व्हायरल

'पेपेटा' गाण्याच्या माध्यमातून नोराचा एक अनोखा अंदाज चाहत्यांच्या भेटीस आला आहे.

Updated: Sep 10, 2019, 03:48 PM IST
'बार्बी लूक'मुळे नोराचे चाहते घायाळ, 'पेपेटा' व्हिडिओ व्हायरल  title=

मुंबई : अभिनेत्री नोरा फतेहीने तिच्या डान्समुळे बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. गेल्या काहीदिवसांपासून 'बार्बी डॉल'च्या रूपात चर्चेत आलेल्या नोराने चाहत्यांना घायाळ केले आहे. तिचा नवीन म्यूझीक व्हिडिओ 'पेपेटा' आज प्रदर्शित करण्यात आला आहे. प्रदर्शित झाल्यानंतर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. 

'पेपेटा' गाण्याच्या माध्यमातून नोराचा एक अनोखा अंदाज चाहत्यांच्या भेटीस आला आहे. हा व्हिडिओ एका दिवसात २७ लाखांपेक्षा जास्त चाहत्यांनी पाहिला आहे. नोराने हा व्हिडिओ तिच्या सोशल अकाउंटवर देखील पोस्ट केला आहे. 

नोरा फतोही आगामी 'स्ट्रीट डान्सर' चित्रपटात भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात नोरा शिवाय अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता वरूण धवन देखील झळकणार आहे. 'स्ट्रीट डान्सर' चित्रपट २४ जानेवारी २०२० मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.