नोरा फतेहीने चाहत्यांसोबत शेअर केली 'गुड न्यूज'

नक्की कोणती आहे 'गुड न्यूज'?  

Updated: Jan 8, 2022, 04:03 PM IST
नोरा फतेहीने चाहत्यांसोबत शेअर केली 'गुड न्यूज' title=

मुंबई : नोरा फतेही ही सोशल मीडिया सेन्सेशन आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. ती नेहमीच सुंदर फोटो आणि व्हिडीओतून तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित करत असते. ती तिच्या आकर्षक फोटोंसोबतच आधुनिक प्रो-मॉडर्न ड्रेसिंग सेन्समुळे जास्त ओळखली जाते. पण गेल्या काही दिवसांपासून नोरा दिसली नाही. कारण कोरोना झाल्यामुळे ती उपचार घेत होती. 

नोराने पोस्ट करत कोरोना झल्याची माहिती दिली. पण आता ती कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडली आहे. नोराने इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून चाहत्यांसोबत एक 'गुड न्यूज' शेअर केली आहे. 

नोरा म्हणाली, 'माझी कोरोना चचणी निगेटिव्ह आली आहे. तुमच्या सर्व प्रार्थनांसाठी धन्यवाद. माझ्यासाठी तो काळ खूप कठीण होता. मी लवकरच कामावर परतेल.  या नवीन वर्षात मला खूप मेहनत करायची आहे. तुम्ही सर्व सुरक्षित रहा.' सध्या नोराची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.

नुकतच नोराचं 'नाच मेरी रानी' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. या गाण्यात नोराचा जबरदस्त डान्स आपल्याला पाहायला मिळाला होता. गुरु रांधवाचं हे गाणं प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे.