सलमान खानसोबत नव्या वर्षात दिसली नवा सुंदरी, इतक्या वर्षानंतर झाली भेट

नुकताच सलमान खानने ५६वा  वाढदिवस साजरा केला आहे

Updated: Jan 1, 2022, 03:28 PM IST
सलमान खानसोबत नव्या वर्षात दिसली नवा सुंदरी, इतक्या वर्षानंतर झाली भेट title=

मुंबई : नुकताच सलमान खानने ५६वा  वाढदिवस साजरा केला आहे. अनीस बज्मीसोबत 'नो एंट्री में एंट्री' या चित्रपटाच्या सिक्वेलची त्याने नुकतीच घोषणा केली आहे. या कॉमेडी चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात करणार असल्याचं अभिनेत्याने सांगितलं.  'नो एंट्री में एंट्री'  या चित्रपटात सलमान एक-दोन नव्हे तर तिहेरी भूमिकेत दिसणार आहे.

सलमानशिवाय अनिल कपूर आणि फरदीन खान हे देखील तिहेरी भूमिकेत दिसणार आहेत. विशेष म्हणजे या सगळ्या 9 पात्रांसाठी निर्मात्यांनी 9 वेगवेगळ्या अभिनेत्रींना कास्ट करण्याची योजना सुरू केली आहे. त्यापैकी 4 अभिनेत्रींची नावं निश्चित झाली आहेत.

डेझी शाहच्या नावावर शिक्कामोर्बत
सुत्रानुसार ''नो एंट्री सिक्वेलचं प्लॅनिंग गेल्या 6 वर्षांपासून सुरू होतं. आणि आता त्याची स्क्रिप्ट अखेर फायनल झाली आहे. निर्मात्यांनी अनिल कपूर, सलमान खान आणि या चित्रपटातील जुनी स्टारकास्ट ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. फरदीन खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे.अभिनेत्रीबद्दल बोलायचा तर या चित्रपटात 9 वेगवेगळ्या अभिनेत्रीही दिसणार आहेत.

या 9 अभिनेत्रींमध्ये बिपाशा बासू, सेलिना जेटली आणि लारा दत्ता व्यतिरिक्त डेझी शाहचं नाव समोर येत आहे. या चित्रपटात डेझी शाहचा कॅमिओ रोल आणि आयटम साँग असणार आहे. या सिनेमात कॅचलाईन सारखीच असेल, तीन नवरे दिशाभूल करू पाहत आहेत आणि त्यातून आलेला वेडेपणा." अशी सिनेमाची स्टोरी असेल.

सलमान-डेझीने तीन चित्रपट एकत्र केले आहेत
'नो एंट्री में एंट्री' हा चौथा चित्रपट असेल ज्यामध्ये सलमान खान आणि डेजी शाह एकत्र दिसणार आहेत. 2003 मध्ये रिलीज झालेल्या 'तेरे नाम' या चित्रपटातील सलमानच्या 'लगन लागी' गाण्यात डेझी डान्सरच्या भूमिकेत दिसली होती. 2014 मध्ये आलेल्या 'जय हो' चित्रपटात तिने सलमानच्या प्रेयसिची भूमिका साकारली होती. त्याचवेळी, डेझीने 2018 मध्ये आलेल्या 'रेस 3' चित्रपटात सलमानच्या सावत्र बहिणीची भूमिका साकारली होती.