Nitish Bharadwaj Separated From Wife: नीतीश भारद्वाज यांचा घटस्फोट, १२ वर्षांचं नातं संपवलं

मुलांना कमी वेदना द्यायचा विचार करून घटस्फोट घेण्याचा निर्णय 

Updated: Jan 18, 2022, 12:48 PM IST
Nitish Bharadwaj Separated From Wife: नीतीश भारद्वाज यांचा घटस्फोट, १२ वर्षांचं नातं संपवलं  title=

मुंबई : 'महाभारत' अभिनेता नितीश भारद्वाज यांनी पत्नी स्मितासोबत 12 वर्षांनंतर फारकत घेतली आहे. पत्नी व्यवसायाने आयएएस अधिकारी आहे. सप्टेंबर 2019 मध्ये जोडप्याचे नाते तुटले. या दोघांना जुळ्या मुली आहेत ज्या आई स्मितासोबत इंदौरमध्ये राहत आहे. एका मुलाखतीत नीतीश भारद्वाज यांनी पत्नी स्मितापासून वेगळं झाल्याची माहिती दिली. 

टीव्ही सीरियल 'महाभारत'मध्ये भगवान कृष्णाची भूमिका साकारणारे अभिनेता नितीश भारद्वाजने 2019 मध्ये पत्नी आणि IS अधिकारी स्मिता गेट हिच्याशी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. दोघांना जुळ्या मुली आहेत, त्या सध्या आपल्या आईसोबत इंदूरमध्ये राहतात. नीतीश भारद्वाज यांनी त्यांच्या पत्नीशी विभक्त झाल्याबद्दल उघडपणे बोलले आहे.

आजकाल मनोरंजन विश्वात अनेक प्रकारची नाती बिघडत आहेत. कुठे एखादे जोडपे दीर्घकाळ डेट केल्यानंतर पती-पत्नीच्या नात्यात बांधले जात आहे. तर काही आपले नाते संपवून आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. नुकताच अभिनेता धनुष आणि ऐश्वर्या यांचाही नुकताच घटस्फोट झाला आहे. या दोघांनी आपलं १८ वर्षांचं नातं तोडलं आहे. (Dhanush Aishwarya Divorce : एकाएकी घाईतच का झालेलं धनुष- ऐश्वर्याचं लग्न?) 

 

अशी अनेक जोडपी आहेत जी आयुष्यातील बरीच वर्षे एकत्र घालवल्यानंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतात. टीव्ही अभिनेता नितीश भारद्वाज ज्यांनी लग्नाच्या 12 वर्षानंतर पत्नीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला.

नितीश भारद्वाज यांनी 'बॉम्बे-टाइम्स' ला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या घटस्फोटाबद्दल बोलताना सांगितले की, "होय, मी सप्टेंबर 2019 मध्ये मुंबईच्या कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. आम्ही वेगळे का होतोय याची कारण मी शोधत नाही. प्रकरण आता कोर्टात आहे. मी एवढेच म्हणू शकतो की, कधी कधी घटस्फोट मृत्यूपेक्षा जास्त वेदनादायक असू शकतो, कारण तुम्ही तुटलेल्या गाभ्यासह जगता.

लग्नाबाबत आपले मत व्यक्त करताना नितीश म्हणाले, "मी यावर ठाम विश्वास ठेवतो, परंतु मी दुर्दैवी ठरलो. सहसा विवाह तुटण्याची कारणे अमर्याद असू शकतात, काहीवेळा ती अस्थिर वृत्ती किंवा करुणेच्या अभावामुळे किंवा अहंकार आणि आत्मकेंद्रित विचारसरणीचा परिणाम असू शकते. पण जेव्हा कुटुंब तुटते तेव्हा सगळ्यात जास्त त्रास मुलांना होतो. त्यामुळे आपल्या मुलांना इजा होणार नाही याची काळजी घेणे ही पालकांची जबाबदारी आहे."

त्याच मुलाखतीत 'तो त्याच्या मुलींच्या नियमित संपर्कात आहे का?' अभिनेत्याने उत्तर दिले, "मी त्यांना भेटू शकेन की नाही हे मला माझ्या भावना राखून ठेवायच्या आहेत." सध्या नितीश भारद्वाज यांनी कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे, ज्याची ते प्रतीक्षा करत आहेत. मग याबाबत ते अधिक मोकळेपणाने बोलतील असं सांगितलं.