नील नितिन मुकेशच्या मुलीचा पहिला फोटो सोशल मीडियात चर्चेत

या फोटोत त्याने नूरवीला कडेवर घेतलंय.

Updated: Sep 24, 2018, 12:58 PM IST
नील नितिन मुकेशच्या मुलीचा पहिला फोटो सोशल मीडियात चर्चेत  title=

नवी दिल्ली : बॉलीवुड स्टार नील नितिन मुकेश आणि पत्नी रुक्मिणीने गोंडस मुलीला जन्म दिल्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. मुंबईतील ब्रीच कॅंडी हॉस्पीटलमध्ये साडेतीन वाजता रुक्मिणीने बाळाला जन्म दिला. त्यांच्या परिवाराने ही आनंदाची बातमी सर्वांना दिली. त्यांनी आपल्या मुलीचे नाव नूरवी नील मुकेश ठेवलं असून तिचा पहिला फोटोही शेअर केलाय. या फोटोत त्याने नूरवीला कडेवर घेतलंय. पत्नी रुक्मिणीही त्याच्यासोबत आहे. रुक्मिणी आणि नील दोन नावाचं मिळून नूरवी असं नाव बनलयं.  

 
 
 
 

A post shared by Neil Nitin Mukesh (@neilnitinmukesh) on

नूरमी ही खूपच क्यूट

 
 
 
 

A post shared by Saleha Malik (@salehatab143) on

आम्हाला मुलगी झाल्याचे सांगताना खूप अभिमान वाटत असल्याचे नीलने यावेळी सांगितले. नूरमी ही खूपच क्यूट आणि सोज्वळ दिसतेय. नीलने शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर खूप शेअर होतोय. चाहते नीलवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

रूक्मिणीच्या भावना 

रूकिमीने नीलचं कौतुक करताना तो उत्तम पती आहे पण त्यासोबतच चांगला पिताही होणार आहे अशी आशा व्यक्त केली. गेले काही दिवस आम्ही चांगलं बेबी शॉपिंग करत आहोत. या दरम्यान मेडिटेसहन,योगा, संगीत याकडे आम्ही विशेष लक्ष दिले आहे.