नोरा, Jacqueline मागोमाग 'ही' मराठी अभिनेत्रीसुद्धा सुकेश चंद्रशेखरच्या जाळ्यात, पाहा कुठे फसली

जाणून घ्या कोण आहे 'ही' अभिनेत्री

Updated: Sep 16, 2022, 12:14 PM IST
नोरा, Jacqueline मागोमाग 'ही' मराठी अभिनेत्रीसुद्धा सुकेश चंद्रशेखरच्या जाळ्यात, पाहा कुठे फसली title=

मुंबई : कॉनमन सुकेश चंद्रशेखर विरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणात सुरू असलेल्या तपासादरम्यान बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांची नावं पुढे आली आहेत. रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की केवळ जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline fernandez) किंवा नोरा फतेही  (Nora Fatehi) यांच्याशिवाय आणखी चार अभिनेत्री सुकेशला भेटण्यासाठी तुरुंगाच गेल्या होत्या. या चार अभिनेत्रींमध्ये एक मराठी अभिनेत्री देखील आहे. ही मराठमोळी अभिनेत्री बिग बॉस फेम निक्की तांबोळी आहे. याशिवाय त्यानं निक्कीला देखील महागड गिफ्ट दिलं होतं. 

आणखी वाचा : Reel मध्ये डोळा मारल्यामुळे होणाऱ्या ट्रोलिंगवर ऐश्वर्या यांच सडतोड उत्तर, म्हणाल्या...

याच प्रकरणी अभिनेत्री नोरा फतेही गुरुवारी दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेसमोर (EOW) हजर झाली. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, निक्की तांबोळी अभिनेत्रीचं खरं नाव निकिता तांबोळी आहे. तिनं पिंकी इराणीच्या माध्यमातून सुकेशशी भेट घेतली होती. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंकी इराणी सुकेशच्या अगदी जवळची व्यक्ती आहे.

आणखी वाचा : ऐश्वर्याचा 'तो' व्हिडीओ समोर येताच नेटकरी म्हणतात, 'किती तो Attitude...'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : 'जर तू जीन्स घातलीस तर...', राज कपूर यांचं बोलणं ऐकून मंदाकिनी थांबलीच...

निक्कीनं पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं आहे की, पिंकीनं सुकेशची ओळख दाक्षिणात्य निर्माता 'शेखर' म्हणून करुन दिली होती. रिपोर्टनुसार, निक्की तिहार तुरुंगात सुकेशला दोनदा भेटली आहे. ईडीनं दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये असं म्हटलं आहे की, एप्रिल 2018 मध्ये सुकेशनं पिंकीला 10 लाख रुपये दिले होते. त्यापैकी 1.5 लाख रुपये निक्की तांबोळीला दिले होते. दुसऱ्यांदा, म्हणजेच त्यांच्या पहिल्या भेटीच्या काही आठवड्यांनंतर, निक्की एकटीच सुकेशला भेटायला गेली तेव्हा तिला 2 लाख रुपये आणि एक गुच्ची बॅग (Gucci bag) देण्यात आली होती. निक्कीला 3.5 लाख रुपयांची ही बॅग होती. मूळचा कर्नाटकातील बंगळुरूचा रहिवासी असलेला सुकेश सध्या दिल्लीच्या तुरुंगात आहे आणि त्याच्यावर 10 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.