चट शादी और पट बेबी! Neha Kakkarचा नवा फोटो देतोय 'गुड न्‍यूज'

प्रसिद्ध गायिका नेहा कक्करचं अलिकडेच लग्न झालं. रायझिंग स्टार फेम गायक रोहनप्रीत सिंगसोबत २४ ऑक्टोबरला नेहाने लग्नगाठ बांधली.

Updated: Dec 18, 2020, 04:30 PM IST
चट शादी और पट बेबी! Neha Kakkarचा नवा फोटो देतोय 'गुड न्‍यूज' title=

मुंबई  :  प्रसिद्ध गायिका नेहा कक्करचं अलिकडेच लग्न झालं. रायझिंग स्टार फेम गायक रोहनप्रीत सिंगसोबत २४ ऑक्टोबरला नेहाने लग्नगाठ बांधली. मात्र आता नेहाच्या लग्नाची नाही तर नेहाच्या प्रेग्नेसीची चर्चा रंगतेय. नेहा लवकरच आई होणार असून तिने सोशल मीडियावर आपला एक फोटो शेअर केलाय. विशेष म्हणजे नेहाचा हा फोटो पाहून ती लग्नापूर्वीच प्रेग्नंट असल्याचं म्हटलं जातंय.

या फोटोमध्ये नेहाचं बेबीबंप दिसत असून, नेहाच्या चाहत्यांनी तिला तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय. विशेष म्हणजे अनेक सेलिब्रिटींनीदेखील तिला आणि रोहनप्रीतला शुभेच्छा दिल्या आहेत. नेहाने फोटो शेअर करत “खयाल रखा कर”, असं कॅप्शन दिलंय. 

तिच्या या फोटोवर “आता तर आणखी जास्त काळजी घ्यावी लागेल”, अशी कमेंट नेहाचा पती रोहनप्रीतने केली आहे.दरम्यान, नेहाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. नेहा आणि रोहनप्रीत या दोघांनी २४ ऑक्टोबर रोजी लग्नगाठ बांधली असून त्यांच्या लग्नाला केवळ तीन महिने पूर्ण होत आहेत.