नेहा कक्कडचा टिकटॉक व्हिडिओ झाला व्हायरल

ब्रेकअपची बातमीसुद्धा नेहाने इन्स्टाग्रामवरच शेअर केली होती.

Updated: Dec 24, 2018, 05:38 PM IST
नेहा कक्कडचा टिकटॉक व्हिडिओ झाला व्हायरल title=

नवी दिल्ली - बॉलिवूडमधील गायिका नेहा कक्कड गेल्या काही दिवसांपासून तिच्या ब्रेकअपच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असणाऱ्या काही सेलिब्रिटींमध्ये नेहा कक्कडचा समावेश होतो. आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ नेहा कायम शेअर करते. ब्रेकअपची बातमीसुद्धा नेहाने इन्स्टाग्रामवरच शेअर केली होती. नुकताच नेहाने टिकटॉक व्हिडिओ व्यासपीठावर पदार्पण केले. याचाच एक व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला असून, त्याला आतापर्यंत १८ लाखांहून अधिक फॅन्सनी बघितले आहे.

मी आता टिकटॉकवरही आले आहे. तुम्ही मला तिथेही फॉलो करू शकता, अशा स्वरुपाचा संदेश तिने सोशल मीडियावर दिला आहे. याआधीही नेहाने सोशल मीडियावर तिचे वेगवेगळे फोटो शेअर केले होते आणि आयुष्यात कायम सकारात्मक राहिले पाहिजे, असा संदेश दिला होता.

बॉयफ्रेंड हिमांश कोहलीशी ब्रेकअप झाल्याचे नेहाने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून जाहीर केले होते. त्यानंतर तिने सगळ्या पोस्ट डिलिटही केल्या होत्या. एकामागून एक वेगवेगळ्या पोस्ट तिने काढून टाकल्या होत्या. इंडियन आयडॉलच्या सेटवर सगळ्यांसमोर नेहा आणि हिमांश यांनी आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. नेहा ही भावनिक मुलगी असल्याचे तिच्या वेगवेगळ्या पोस्ट बघून कळते.