अपघातानंतर नेहा धुपियाच्या मदतीला नव्हे तर सेल्फीसाठी रसिकांंचा गराडा !

' नो फिल्टर नेहा' सीझन 2 या कार्यक्रमाच्या प्रमोशनदरम्यान नेहा धुपियाचा चंदीगढ येथे अपघात झाला.

Updated: Aug 11, 2017, 06:33 PM IST
अपघातानंतर नेहा धुपियाच्या मदतीला नव्हे तर सेल्फीसाठी रसिकांंचा गराडा !  title=

नवी दिल्ली : ' नो फिल्टर नेहा' सीझन 2 या कार्यक्रमाच्या प्रमोशनदरम्यान नेहा धुपियाचा चंदीगढ येथे अपघात झाला.

 हा कार अपघात 2 वाजता झाल्याने वाहतुकीची कोंडीही मोठ्या प्रमाणात झाली होती.

या कार अपघातामध्ये नेहाला किरकोळ दुखापत झाली आहे. खांद्याला मार लागला आहे.  पण अपघातग्रस्त माणसाला मदत करण्याऐवजी सेल्फी साठीच अधिक लोकं जमल्याचा अनुभव नेहाला  आला.  काहीजण तर  नेहाकडे चक्क सही घेण्यासाठीही आले होते.  

२०१६ साली नेहाने पॉडकास्टवर ' नो फिल्टर नेहा' या कार्यक्रमाला सुरवात केली होती. या कार्यक्रमामध्ये नेहा सेलिब्रेटीजची मुलाखत घेते. त्यांच्या जीवानाशी निगडीत काही खास गोष्टी रसिकांसमोर उलगडण्याचा प्रयत्न करते.  पहिल्या सीझन  रसिकांना खास आवडला होता. आता  नेहा लवकरच दुसरा सीझन घेऊन ती आपल्यासमोर येणार आहे.