नेहा धुपियाचा आणखी एक धक्कादायक खुलासा... यासाठी केलं गडबडीत लग्न

नेहाने यासाठी गडबडीत केलं लग्न 

नेहा धुपियाचा आणखी एक धक्कादायक खुलासा... यासाठी केलं गडबडीत लग्न  title=

मुंबई : नेहा धूपियाचा 'हेलिकॉप्टर' हा सिनेमा लवकरच येणार आहे. या सिनेमात नेहा काजोलसोबत दिसणार आहे. या सिनेमाबाबत ती भरपूर उत्साही आहे. या सिनेमाव्यतिरिक्त नेहाकडे आणखी एक आनंदाच कारण आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नेहा धुपिया लवकरच आई होणार आहे. नेहाने मे 2018 मध्ये अभिनेता अंगद बेदीसोबत अगदी तडकाफडकी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 

बाप होण्यावर अंगद बेदी काय म्हणाला? 

'सूरमा' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये अंगदला खूप खाजगी प्रश्न विचारण्यात आला. अंगदला नेहा धुपिया प्रेग्नेंट आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्याने नकार दिला आहे. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नेहा आणि अंगद सध्या तरी बाळाच्या येण्याबाबत कुणाशीच बोलू इच्छित नाहीत. योग्य वेळ आल्यावर ते स्वतःच याविषयावर घोषणा करणार आहेत. डीएनएने दिलेल्या माहितीनुसार, नेहाने याबाबत कोणतीच माहिती दिलेली नाही. 

एवढंच काय तर आता अशी चर्चा आहे की, नेहाने हल्लीच बूब जॉब देखील करून घेतली आहे. आपल्या फिगरला आणखी आकर्षक करण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री ही सर्जरी करून घेतात. अशातच नेहा धुपियाने देखील ब्रेस्ट सर्जरी केल्याची चर्चा रंगली आहे.