Neetu Kapoor यांच्याकडून Rishi Kapoor यांची शेवटची आठवण शेअर

गेल्या वर्षी ऋषी कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला, पण नितू कपूर त्यांच्या आठवणी ताज्या करत आहेत. 

Updated: Mar 25, 2021, 04:22 PM IST
Neetu Kapoor यांच्याकडून  Rishi Kapoor यांची शेवटची आठवण शेअर  title=

मुंबई : गेल्या वर्षी अनेक दिग्गज कलाकारांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला. त्यामुळे बॉलिवूड  विश्वाला मोठा धक्का  बसला. परंतू आजही त्यांच्या आठवणी आपल्यात आहेत. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांचं देखील गेल्या वर्षी निधन झालं. त्यांच्या मृत्यूला ११ महिने पूर्ण  झाले आहेत. अशात त्यांची  पत्नी नितू कपूर यांनी ऋषी कपूर यांची शेवटची आठवण सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर  केली. त्यांची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.  व्हिडिओमध्ये  ऋषी कपूर रास्त्यांवर गाणं म्हणत आनंद लुटताना दिसत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by neetu Kapoor. Fightingfyt (@neetu54)

नितू कपूर यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये ते दोघे न्यूयॉर्कमध्ये फिरताना दिसत आहेत. सांगायचं  झालं तर नितू कपूर कायम ऋषी कपूर यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. आता व्हिडिओ शेअर करत ऋषी यांचा निधनाला 11 महिने पूर्ण झाल्याचं सांगितलं आहे. 

नितू कपूर यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ त्यांच्या शेवटच्या ट्रिपचा आहे. व्हिडिओत  ऋषी कपूर अनोख्या अंदाजात आनंद लुटताना दिसत आहेत. महत्त्वाचं म्हणजे अभिनेते अनुपम खेर यांनी देखील नितू कपूर यांच्या फोटोवर कमेंट कंली आहे. 'पुन्हा तुझी आठवण आली...' असं त्यांनी म्हटलं आहे.