का होतेय नीतू कपूर आणि ऋषी कपूर यांची लग्नपत्रिका व्हायरल?

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाची चाहत्यांना खूप उत्सुकता आहे.

Updated: Apr 8, 2022, 06:13 PM IST
का होतेय नीतू कपूर आणि ऋषी कपूर यांची लग्नपत्रिका व्हायरल? title=

मुंबई : सध्या कपूर कुटुंबात वेडिंग बेल वाजण्याची तयारी सुरू आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाची चाहत्यांना खूप उत्सुकता आहे. दरम्यान, नीतू कपूर आणि ऋषी कपूर यांच्या लग्नाचं रिसेप्शन कार्ड सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या कार्डमध्ये त्यांनी आरकेचा लोगोही लावला आहे. हे कार्ड 1980 सालचं आहे. त्याचबरोबर, आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचं लग्न देखील ईथे होईल अशी अपेक्षा आहे. मात्र याला अद्याप कपूर कुटुंबाकडून कोणतीही पुष्टी मिळालेली नाही.

नीतू कपूर आणि ऋषी कपूर यांचं आरके हाऊसमध्ये लग्न झालं होतं. या कार्डमध्ये 23 जानेवारीला दोघांचं लग्नाचं रिसेप्शन असल्याचं दिसून येत आहे. त्याचबरोबर 42 वर्षांनंतर हे कार्ड सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. , सूत्रानुसार, रणबीर कपूरने देखील त्याची गर्लफ्रेंड आलिया भट्टसोबत याच ठिकाणी सात फेऱ्या घेण्याचा निर्णय घेतला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सध्या प्रत्येकजण रणबीर आलियाच्या लग्नाची वाट पाहत आहे. पर्सनल लाईफशिवाय हे दोघंही त्यांच्या प्रोफेशनल लाईफमुळेही चर्चेत आहेत. आलिया आणि रणबीर दोघंही 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. आता चाहतेही या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.