नीना गुप्ता होणार आजी, लेक मसाबाने दिली गुडन्यूज, पतीसोबत शेअर केला गोड फोटो

मसाबा गुप्ता आणि सत्यदीप मिश्राने गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात लग्नगाठ बांधली. त्यानंतर आता वर्षभराने त्या दोघांनी आई-बाबा होणार असल्याची गुडन्यूज दिली आहे. 

Updated: Apr 18, 2024, 08:10 PM IST
नीना गुप्ता होणार आजी, लेक मसाबाने दिली गुडन्यूज, पतीसोबत शेअर केला गोड फोटो title=

Masaba Gupta Announces Pregnancy : ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता या लवकरच आजी होणार आहेत. नीना गुप्ता यांची मुलगी आणि बॉलिवूडची प्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता लवकरच आई होणार आहे. मसाबा गुप्ताने एक पोस्ट शेअर करत याबद्दलची गुडन्यूज दिली आहे. यात ती बेबी बंपही फ्लॉन्ट करताना दिसत आहे. मसाबा गुप्ता आणि सत्यदीप मिश्राने गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात लग्नगाठ बांधली. त्यानंतर आता वर्षभराने त्या दोघांनी आई-बाबा होणार असल्याची गुडन्यूज दिली आहे. 

मसाबा गुप्ताने सोशल मीडियाद्वारे दिली गुडन्यूज

मसाबा गुप्ता ही सोशल मीडियावर सक्रीय असते. तिने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने काही फोटोही पोस्ट केले आहे. यातील पहिल्या फोटोत तिने प्रेग्नेंट बाईचा इमोजी आणि सुर्यफुलाचा इमोजी शेअर केला आहे. तर दुसऱ्या फोटोत तिने कुरळे केस असलेल्या एका मुलीचा आणि एका मुलाचा इमोजी शेअर केला आहे. तसेच तिसऱ्या फोटोत ती सत्यदीपच्या खांद्यावर डोकं ठेवून शांत झोपल्याचे दिसत आहे. या फोटोंना कॅप्शन देताना तिने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. "दोन लहान पावलं लवकरच येणार आहेत. त्यामुळे आम्हाला प्रेम, आशीर्वाद आणि केळ्याचे वेफर्स पाठवायला विसरु नका. बेबी ऑन बोर्ड, मॉम-डॅड", असे मसाबाने म्हटले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Masaba (@masabagupta)

मसाबाच्या या गुडन्यूजनंतर सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. सारा तेंडुलकरने 'अभिनंदन' असे म्हणत बाळाचा इमोजी पोस्ट केला आहे. तर ईशा देओल, गौहर खान, ताहिरा कश्यप, परिणिती चोप्रा या कलाकारांनीही कमेंट करत मसाबा आणि सत्यदीपचे अभिनंदन केले आहे. सध्या मसाबाची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

मसाबा गुप्ता आणि सत्यदीप मिश्राचे दुसरे लग्न

दरम्यान मसाबा गुप्ताने 2015 मध्ये निर्माता मधु मंटेनासोबत लग्नगाठ बांधली होती. पण 2018 मध्ये त्यांच्या नात्यात फूट पडली. त्या दोघांनी 2019 मध्ये घटस्फोट घेतला. त्यानंतर गेल्यावर्षी 27 जानेवारी 2023 रोजी मसाबाने सत्यदीप मिश्रासोबत लग्नगाठ बांधली. सत्यदीप हा अभिनेत्री अदिती राव हैदरीचा पहिला पती आहे. अदिती आणि सत्यदीप यांनी 2013 मध्ये घटस्फोट घेतला होता. मसाबा गुप्ता हे फॅशन इंडस्ट्रीत गाजलेले नाव आहे. काही वर्षांपूर्वी मसाबा मसाबा या वेबसीरिजच्या माध्यमातून अभिनयातही पदार्पण केले आहे. नीना गुप्ता यांच्यासह असलेलं नातं व फॅशन इंडस्ट्रीतील मेहनतीवर आधारित मसाबा मसाबा सीरीज नेटफ्लिसवर बरीच चर्चेत आली होती.