मुंबई : टेलिव्हिजनवरील कॉमेडी किंग कपिल शर्मा काही वैयक्तिक कारणांमुळे गेले काही दिवस दूर गेला होता. मात्र लवकरच कपिल टेव्हिजनवर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे.
कपिल शर्माचा नवा शो ' फॅमिली टाईम विथ कपिल शर्मा' हा कॉमेडी शो आहे. विनोद हा या कार्यक्रमाचा मुख्य भाग असला तरीही यंदा त्यामध्ये फॅमिलीदेखील सहभाग घेणार आहे. त्यामुळे कपिल शर्माचा नवा शो आणि हटके अंदाज याबद्दल त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार हा शो 25 मार्चपासून सुरू होणार आहे. मात्र अजूनही त्याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. पोलडान्समुळे चर्चेत आलेली 'ही' मराठी अभिनेत्री कपिल शर्माच्या शोची होस्ट होणार ?
कॉमेडी शो विथ कपिल शर्मा या कार्यक्रमामध्ये नवज्योत सिंग सिंधूसोबत इतर कलाकार मंडळींनीही कपिल शर्माच्या शोमध्ये सहभाग घेतला होता. दरम्यान ऑस्ट्रेलियाहून परतताना कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हरमध्ये वाद झाला होता. या वादानंतरच सुनील ग्रोव्हरने कार्यक्रम सोडला. त्यापाठोपाठ अनेक कलाकारांनी हा शो सोडला.
नवज्योत सिंग सिंधूंचा या कार्यक्रमामध्ये थेट सहभाग नसला तरीही त्यांची शेरोशायरी हीट होती. नव्या फॉर्मेटमध्ये नवज्योत सिंग सिंधू काय भूमिका साकारणार हे अजून गुलदस्त्यात आहे. कपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनील ग्रोव्हर आणि शिल्पा शिंदे एकत्र येणार ?