माझा जन्मच संगीतमय सिनेमांसाठी - रणवीर सिंग

सिनेमात स्ट्रीट रॅपरची भूमिका बजावताना रणवीर दिसणार

Updated: Jan 10, 2019, 05:45 PM IST
माझा जन्मच संगीतमय सिनेमांसाठी - रणवीर सिंग title=

मुंबई: 'सिंबा'च्या अभूतपू्र्व यशानंतर अभिनेता रणवीर सिंगचा पुढचा सिनेमा 'गली बॉय' प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. सिनेमात स्ट्रीट रॅपरची भूमिका बजावताना रणवीर दिसणार आहे. माझा जन्म संगीतमय सिनेमांसाठी झाला असल्याचे रणवीर सिंगचे म्हणणे आहे. रणवीरने सहकलाकार आलिया भट सोबत 'गली बॉय'च्या ट्रेलर लॉन्चवेळी हे वक्तव्य केले. सिनेमाचे दिग्दर्शक जोया अख्तर, निर्माता फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी पण त्यांच्यासोबत उपस्थित होते. ट्रेलर लॉन्चवेळी रणवीरने आपल्यासाठी हा सिनेमा अतिशय खास आहे, असे सांगितले. तो म्हणाला, जेव्हा मला 'गली बॉय' सिनेमाबद्दल सांगितले तेव्हा हा सिनेमा माझाच असल्याचे मी म्हणालो. जर माझ्या जागी अन्य कोणाला हा सिनेमा दिला गेला असता, तर मला वाईट वाटले असते. मी 'गली बॉय'मध्ये काम करण्यासाठी जन्मलो आहे आणि मला माहिती होतं हे पात्र मी चांगल्या प्रकारे साकारू शकतो.

Image result for gully boy trailer launch zee news

अभिनेता रणवीरच्या सांगण्यानुसार हा सिनेमा बऱ्याच कारणांमुळे विशेष आहे 'गली बॉय'मध्ये चाहत्यांना अनेक गोष्टी एकत्र अनुभवायला मिळणार आहेत. ज्यामध्ये रॅप, हिप-हॉप संगीत आहे. जे मला लहानपणापासूनच पसंत आहे.  रणवीर सिंगच्या 'गली बॉय'चा ट्रेलर लॉन्च झाला. रणवीर डोळ्यात काजळ घालून रॅपच्या जगात कल्ला करण्यासाठी सज्ज झाला आहे. ट्रेलर लॉन्चमध्ये आलिआ भट आणि कलकी कोचलिन अनोख्या अंदाजात समोर आले. ट्रेलर लॉन्चवेळी रणवीर रॅपरची भूमिका बजावताना दिसला. आता 'गली बॉय' चाहत्यांच्या पसंतीस उतरणार की नाही हे पाहणे मजेशीर असणार आहे.